मान्सून पूर्व धोकादायक वृक्ष छाटणीकडे दुर्लक्ष

वाशी : नवी मुंबई महापालिका उद्यान विभागामार्फत मान्सून पूर्व धोकादायक वृक्षांची छाटणी केली जाते. मात्र,  मान्सून पूर्व धोकादायक वृक्ष छाटणी योग्यरित्या केली जात नसल्याने नवी मुंबई शहरात आजही अनेक वृक्ष रस्त्यात झुकल्याचे चित्र दिसत असून, झुकलेले वृक्ष कधीही कोसळण्याची शवयता बळावली आहे.

१३ ऑगस्ट रोजी ऐरोली सेक्टर-३ मधील नवी मुंबई महापालिका बालमाता रुग्णालय शेजारी एका झुककेल्या झाडाला कंटेनरचा धक्का लागल्याने झुकलेले झाड दुसऱ्या गाडीवर पडले. या घटनेत कुणीही जखमी झाले नसले तरी चारचाकी वाहनाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे महापालिका उद्यान विभाग अधिकाऱ्यांनी येत्या श्रीगणेशोत्सव पूर्वी नवी मुंबई शहरातील झुकलेल्या झाडांची छाटणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 तुर्भे मधील रस्त्यांवरच कचराकुंड्या