ठाणे प्रादेशिक परिवहन विभागामार्फत सुमारे १ हजार ५०० चालकांची नेत्र तपासणी

ठाणे : गेल्या सहा महिन्यांमध्ये ठाणे प्रादेशिक परिवहन विभागामार्फत सुमारे १ हजार ५०० चालकांची नेत्र तपासणी करण्यात आली. याशिवाय रस्ता सुरक्षतेबाबत १० हजार विद्यार्थी-विद्यार्थिनींची चित्रकला स्पर्धा घेण्यात आली, अशी माहिती ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे २२ जानेवारी रोजी राज्य रस्ता सुरक्षा अभियान २०२५ आणि शासनाचा १०० दिवसाचा प्राधान्यक्रम या कार्यक्रमाच्या अनुषंगाने प्रादेशिक परिवहन विभागामार्फत घेण्यात आलेल्या कार्यक्रमांची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषद मध्ये दिली.

ठाणे प्रादेशिक परिवहन विभागामार्फत रस्ता सुरक्षतेबाबत २ हजार स्कूल बस चालक आणि सहवर्ती यांचे शिबीर, ब्लॅक स्पॉट सर्व्हे तसेच त्यातील सुधारणा उपाययोजना, हेल्मेट वापराबाबत नागरीकांमध्ये जनजागृती, सायकल रॅली, दुचाकी रॅली, महिला कार रॅली, रक्तदान शिबीर, मोटार ड्रायव्हिंग स्कूल यांचे शिबीर, शाळा-महाविद्यालयांमध्ये रस्ता सुरक्षतेबाबत व्याख्याने इत्यादी उपक्रम राबविण्यात आले, असे हेमांगिनी पाटील यांनी सांगितले.

याप्रसंगी ठाणे प्रादेशिक परिवहन विभाग, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय यांच्या माध्यमातून लेखक विजय कट्टी यांचे ‘आजीची-रस्ता सुरक्षा बाबतची गोष्ट' नावाचे लहान मुलांचे पुस्तक प्रकाशित करण्यात आले.

यावेळी ठाणे जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी मानसिंग खाडे, धनंजय गोसावी, गणेश पाटील, लेखक विजय कट्टी, सुप्रसिध्द अभिनेते जयराज नायर यांच्यासह प्रादेशिक परिवहन विभाग अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

लालपरीचा प्रवास महागला; रिक्षा-टॅक्सीचीही भाडेवाढ