नवी मुंबई महापालिका जिल्हास्तरीत शालेय क्रीडा स्पर्धेत २३४ शाळा सहभागी

नवी मुंबई ः क्रीडा-युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा परिषद ठाणे यांच्या सहयोगाने, महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महापालिकेच्या वतीने जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धांचा शुभारंभ महापालिका क्रीडा-सांस्वृÀतिक कार्य विभागाचे उपआयुक्त सोमनाथ पोटरे यांच्या हस्ते संपन्न झाले. नेरुळ येथील यशवंतराव चव्हाण क्रीडांगणात आयोजित सदर कार्यक्रमाप्रसंगी शिक्षण विभागाचे उपआयुक्त योगेश कडुसकर, क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव, ठाणे जिल्हास्तर क्रीडा स्पर्धा कार्यकारिणी समिती सदस्य पुरुषोत्तम पुजारी, आदि उपस्थित होते.

नवी मुंबई जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा २०२२-२३ चा शुभारंभ फादर ॲग्नेल वाशी आणि एमजीएम नेरुळ या दोन शाळांच्या संघांमधील १९ वर्षाखालील फुटबॉल सामन्यापासून करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी मैदान पुजन आणि नाणेफेक करुन या सामन्याचा आणि महोत्सवाचा शुभारंभ केला.

सदर जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील २३४ शाळा सहभागी झाल्या असून ३० हजाराहुन अधिक गुणवंत विद्यार्थी खेळाडू या स्पर्धेमधून ४८ क्रीडा प्रकारांमध्ये आपल्या क्रीडागुणांचे प्रदर्शन घडविणार आहेत. फुटबॉल प्रमाणेच टेबल टेनिस, क्रिकेट, जलतरण, खो-खो, कबड्डी, ॲथलेटिक्स, जिम्नॅस्टिक, बॅडमिंटन, रायफल शुटींग, व्हॉलीबॉल, शुटिंगबॉल, ज्युदो, किक्बॉक्सिंग अशा ४८ क्रीडाप्रकारांचा या जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये समावेश आहे. या स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाच्या असून या माध्यमातून नवी मुंबईतील विद्यार्थी खेळाडूंना आपली गुणवत्ता आणि क्षमता सिध्द करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

Read Previous

द्रोणागिरी हायस्कूल इंग्रजी माध्यम करंजा विद्यालयात तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा संपन्न

Read Next

एस. एस. पाटील इंटरनॅशनल स्कूल द्रोणागिरी शाळेतील विदयार्थ्यांनी क्रिडा क्षेत्रात नाविण्यपूर्ण कामगिरी