दुर्लक्षित नागरी प्रश्नांवर लक्ष वेधण्यासाठी शिवसैनिक पदयात्रेने आयुवतांच्या भेटीला
६ किलोमीटर पायी जाऊन आयुवतांकडे मांडले नागरिकांचे गाऱ्हाणे
नवी मुंबई : नेरुळ सेक्टर ४ मधील नागरिकांच्या महत्त्वाच्या प्रश्नांवर महानगरपालिकेचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना (उ.बा.ठा) चे नेरुळ विभागप्रमुख हरीश इंगवले ह्यांच्या नेतृत्वाखाली ९ नोव्हेंबर रोजी शिवसेना जनसंपर्क कार्यालय सेक्टर ४, नेरुळ ते आयुक्त नवी मुंबई महानगरपालिका कार्यालय अशी लक्षवेधी पदयात्रा काढण्यात आली.
ह्यावेळी हरीश इंगवले व इतर त्यांचे सहकारी ६ किमी चालत जाऊन आयुक्ताना निवेदन देऊन आपल्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. आयुक्तांनीही शहर अभियंता व इतर वरिष्ठ अधिकाऱ्याना चर्चेस बोलावून त्वरित कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. ह्या उपक्रमास उपशहर प्रमुख शिवाजीराव शिंदे ह्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. शाखा प्रमुख राजू पिल्लई, ज्येष्ठ शिवसैनिक नरसिंह कुलकर्णी, शिवसैनिक संदेश शिंदे हे पदयात्रेत सहभागी झाले. उपविभागप्रमुख प्रकाश साळुंखे, सेक्टर ४ चे रहिवाशी विनोद सावंत , शीला नायर ह्यांनी आयुक्तांबरोबरील चर्चेत भाग घेतला. नागरिकांच्या समस्यांचे निवारण होईपर्यंत हा लढा असाच सुरु राहील असे हरीश इंगवले यांनी ह्यावेळी स्पष्ट केले.