विचुंबे ग्रामपंचायतीत ‘शेकाप'चा पराभव

ग्रामपंचायत निवडणुकीत ‘भाजप महायुती'ची जोरदार मुसंडी

पनवेल : पनवेल तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजप महायुतीने जोरदार मुसंडी मारली. विशेष म्हणजे विरोधकांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या निवडणुकीतही भाजप महायुतीने बाजी मारली.

 ग्रामपंचायत निवडणुकीत माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, मावळ लोकसभा मतदारसंघ निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, ‘भाजप'चे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या नेतृत्वाखाली ‘भारतीय जनता पार्टी'ने घवघवीत यश संपादन करीत बाजी मारली आहे. विशेषत्वाने अनेक वर्षांपासून शेकापक्षाच्या ताब्यातील विचुंबे ग्रामपंचायतमध्ये ‘भाजप'ने ‘शेकाप'ला चारीमुंड्याचीत करत सत्ता मिळवली. पनवेल तालुक्यातील आणखी एक महत्वाची असलेल्या न्हावे ग्रामपंचायतीचा गड लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अबाधित राहिला. या ठिकाणीही शेकाप युतीचा दारुण पराभव झाला. देवद आणि मालडुंगे ग्रामपंचायत मध्येही भाजप युतीने आपले वर्चस्व कायम ठेवत सत्ता मिळवली. भिंगार, ओवळे, सोमाटणे ग्रामपंचायतीतही भाजप युतीचा करिष्मा पाहायला मिळाला. एकूणच भाजप युतीने सरस कामगिरी करत ‘शेकाप महाविकास आघाडी'चे मनसुबे उधळून लावले.

पनवेल तालुक्यातील ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक ५ नोव्हेंबर रोजी पार पडली. या ग्रामपंचायतीचा निकाल ६ नोव्हेंबर  रोजी पनवेल तहसिलदार कार्यालयात जाहीर झाला. ‘न्हावे ग्रामपंचायत'च्या थेट सरपंचपदी विजेंद्र गणेश पाटील, सदस्य पदी शैलेश वि्ील पाटील, रंजना चंद्रकांत पाटील, सुनिता तुषार भोईर, जागृती नितीन म्हात्रे, सागर कान्हा ठाकूर, नरेश सावळाराम मोकल, ललिता बाळकृष्ण ठाकूर, ‘विचुंबे ग्रामपंचायत'च्या सरपंचपदी प्रमोद शांताराम भिंगारकर, सदस्य पदी अनिल विष्णू भोईर, श्रावणी विवेक भोईर, प्रगती आनंद गोंधळी, आरती अविनाश गायकवाड, विभुती चेतन सुरते, अनंता कमल्या गायकवाड, ‘देवद ग्रामपंचायत'च्या सरपंचपदी विनोद वामन वाघमारे, सदस्य पदी चंद्रा राम वाघमारे, कुंदा पांडुरंग वाघमारे, विजय नाना वाघमारे, साधना वाघमारे, दिनेश रामभाऊ वाघमारे, संदीप गणा वाघमारे, संदीप गणपत वाघमारे, करुणा वासुदेव वाघमारे, ‘भिंगार ग्रामपंचायत'च्या सरपंचपदी गुलाब रामदास वाघमारे, सदस्य पदी अशोक राजाराम गायकर, शामल महेश लहाने, सुनील नारायण पाटील, उज्वला अंबाजी वाघमारे, रीना राजेश पाटील, सुभाष जेठु पाटील, करीना संदेश पाटील, आशा नितीन वाघमारे, ‘मालडुंगे ग्रामपंचायत'च्या सरपंचपदी सिताराम जानू चौधरी, सदस्य पदी विष्णू बुध्या पारधी, ताई चंदर भस्मा, वनिता राजू वाघ, माई प्रकाश खंडवी, अर्जुन मल्या कांबडी, जनार्दन नाग्या निरगुडा, उषा गणपत वारगडा, ‘सोमाटणे ग्रामपंचायत'च्या सरपंचपदी तेजस्विनी आत्माराम पाटील, सदस्य पदी दीपा दीपक पाटील, विशाल रविंद्र पाटील, सुवर्णा रविंद्र कांबळे, अविनाश बामा मुंढे, आंबो पांडुरंग मुंढे, रजनी रामा मुंढे, ‘ओवळे ग्रामपंचायत'च्या सरपंचपदी रुपेश सुरेश गायकवाड तसेच ‘गुळसुंदे ग्रामपंचायत'च्या निवडणुकीत सतिश सदाशिव साठे, अपर्णा वसंत चौलकर, आशा गजानन वीर, जितेंद्र बाळकृष्ण पाटील, रमेश शांताराम मालुसरे, रचना रुपेश चव्हाण यांनी विजय मिळवला.


यावेळी विजयी उमेदवारांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, अरुणशेठ भगत, अनिल भगत, नितीन पाटील, चारुशीला घरत, रत्नप्रभा घरत, संजय पाटील, सचिन पाटील, राजेंद्र पाटील, राजेश्री वावेकर, माजी नगरसेविका दर्शना भोईर, मयुरेश नेतकर, ‘शिवकर ग्रामपंचायत'चे सरपंच आनंद ढवळे, अनेश ढवळे यांच्यासह भाजप पदाधिकारी-कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी अभिनंदन केले. 

 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

सीवुडस्‌ मधील पाळणाघर खुले करण्यासाठी ‘मनसे'चे आंदोलन