विचुंबे येथील उमेदवारांच्या प्रचारार्थ रॅली संपन्न

‘भाजप महायुती'च्या उमेदवारांना विजयी करा -आ. प्रशांत ठाकूर

पनवेल : देशात आणि राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अनेक विकासाची होत असून विचुंबे ग्रामपंचायत मधील विकासाची गाडी आणखी वेगाने धावण्यासाठी तुमच्या सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. त्यामुळे ५ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ, सबका विकास या सुत्राला मतदान करुन ‘भाजपा महायुती'चे थेट सरपंच पदाचे उमेदवार प्रमोद भिंगारकर यांच्यासह सदस्यांना विजयी करा, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रचारा दरम्यान केले. तर यावेळी प्रमोद भिंगारकर यांनी विचुंबे ग्रामपंचायत टँकरमुक्त करु, अशी ग्वाही दिली.

पनवेल तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूक होत आहे. विचुंबे येथील निवडणुकीमध्ये ‘भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे, रिपाइं महायुती'च्या थेट सरपंच पदाचे उमेदवार प्रमोद भिंगारकर तसेच सदस्य पदासाठी प्रभाग क्रमांक-१ मधून निकिता म्हात्रे, श्याम म्हात्रे, संदीप पाटील; प्रभाग-२ मधून ज्योती भोईर, कंकेश गोंधळी, प्रितेश भिंगारकर; प्रभाग-३मधून श्रावणी भोईर, प्रगती गोंधळी, अनिल भोईर; प्रभाग क्र.४ मधून विभुती सुरते, आरती गायकवाड, नितीन भोईर आणि प्रभाग-५मधून भाग्यश्री भोईर, भावना साधू, अनंता गायकवाड निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. या उमेदवारांच्या प्रचारार्थ आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली प्रचार रॅली काढण्यात आली होती.

या रॅलीत ‘भाजपा'चे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, प्रल्हाद केणी, एस. के. नाईक, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, भूपेंद्र पाटील, माजी नगरसेवक ॲड. मनोज भुजबळ, तेजस कांडपिळे, अजय बहिरा, माजी जि. प. सदस्य अमित जाधव, ‘शिवकर'चे सरपंच आनंद ढवळे, किशोर सुरते, अप्पा भागीत, के. सी. पाटील, नितीन भोईर, डी. के. भोईर, विवेक भोईर, नयन भोईर, राम म्हात्रे, महेश भिंगारकर, अविनाश गायकवाड, चेतन सुरते, जयवंत भिंगारकर, प्रल्हाद भोईर, आनंद गोंधळी, जगदीश भोईर, प्रेम भिंगारकर, हरेश जळे, महेंद्र म्हात्रे, संदीप भिंगारकर, चेतन भिंगारकर, अमिता म्हात्रे, अक्षता गायकवाड, संगीता भोईर, नवीता भोईर, सुनीता भोईर, मानसी भोईर, सोनम म्हात्रे, हर्षदा भिंगारकर, प्रतिभा म्हात्रे, शर्मिला जाधव, बनाकाकू म्हात्रे, स्वाती सुरते यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

‘दिबां'च्या जासईत पुन्हा सत्ता स्थापनेसाठी ‘इंडिया महाआघाडी'चे प्रयत्न