पनवेल तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये मनसेचा जोरात प्रचार

पनवेल तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये  मनसे उमेदवारांचा, पक्षाचा जोरात प्रचार

उरण : महाराष्ट्र नवनिर्माण सेना संस्थापक अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांच्या आदेशाने तसेच मनसे विद्यार्थी सेना अध्यक्ष तथा नेते सन्मा. अमित साहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पनवेल तालुकाध्यक्ष  रामदासजी  पाटील, रायगड उप-जिल्हाध्यक्ष (पनवेल विधानसभा) प्रविणजी दळवी यांच्या मुख्य नियोजन व उपस्थितीत १७ पैकी ८ ग्रुप ग्रामपंचायत मध्ये प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी रीटघर, चिचंवली, दुंद्रेरे, आंबे, विचुंबे, भिंगारी, ओवले, वावेघर, न्हावा, अजिवली  कोण, या ग्रुप ग्रामपंचायत मध्ये गावागावात जाऊन तेथील उमेदवारांना बरोबर घेऊन मतदारांना भेटी दिल्या या प्रचार रॅली दरम्यान पनवेल तालुका व विधानसभेतील शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते, सोबत अमोल पाटील तालुका सचिव, संजय तन्ना रस्ते विभाग, को, सोनी बेबी चिटणीस रोजगार महा., नितेश भोईर विभाग अध्यक्ष वावेघर, अरविंद पाटील वावंजे विभाग अध्यक्ष, विजय ठाकूर शाखाध्यक्ष भाताण, संतोष गायकवाड उपशाखा अध्यक्ष,  तुळशीराम पाटील, सावंत पाटील सोरूपाताई , चंचलाताई, बबलू पाटील,खानावले,विकास राठोड वावेघर,  तुशार शेजवल विचुंबे ,दीपेश पोपेटा उपविभाग अध्यक्ष, वैभव ठोंबरे आदी पदाधिकारी, मनसैनिक,मान्यवर उपस्थित होते.यावेळी गावागावातील नागरीक सन्मा. राज साहेब ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या थेट सरपंच व सदस्यांना निवडून  देऊ असा गावकऱ्यांकडून शब्द  देण्यात आले.  गेले वीस वर्षापासून कोणत्याही गावाचा विकास वीज पाणी रस्ते झाल्याचा दिसून येत नाही, गावचा सुशोभिकरण, नुसता भ्रष्टाचार ,पूर्ण निधीची विल्हेवाट लावायची कशी त्यांच्याकडून शिकायचं. सर्वसामान्य जनतेचा मात्र हालच आहे अशा शब्दात मनसेने विरोधकांचा समाचार घेतला व मनसे उमेदवारांचा, पक्षाचा जोरात प्रचार केला.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

विचुंबे येथील उमेदवारांच्या प्रचारार्थ रॅली संपन्न