‘भाजपा'तर्फे रोजगार मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

तरुण-तरुणींनी स्वयंरोजगाराकडे वळावे -आ. मंदाताई म्हात्रे

नवी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हाती घेतलेल्या रोजगार विषयक युवाशक्तीला बळकटी देण्याकरिता त्यांना स्वयंरोजगार देणे महत्वाचे उद्दिष्ट आहे. तसेच दहावी आणि बारावीचे वर्षे विद्यार्थ्याच्या दृष्टीने महत्वाचे असल्याने या दोन वर्षात विद्यार्थ्यांचा जीवनाला वेगळे आणि महत्वाचे वळण मिळत असते. त्याअनुषंगाने शिक्षण आणि करिअर घडविण्यासाठी विविध क्षेत्रांची माहिती देण्यासाठी रोजगार मार्गदर्शन, व्यवसाय मार्गदर्शन आणि सुयोग्य करिअर मार्गदर्शन शिबीर उपयुक्त असते. त्यानुसार भारतीय जनता पार्टी, नवी मुंबईच्या वतीने २९ ऑक्टोबर रोजी सीबीडी, सेक्टर-३ ए मधील वारकरी भवन येथे रोजगार मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराचे उद्‌घाटन ‘बेलापूर'च्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करुन करण्यात आले.

सदर रोजगार मार्गदर्शन शिबिरात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ‘इंटीग्रिटी करिअर सोलुशन'चे संचालक युवराज पवार यांनी भविष्यातील करिअर, नियोजन, करिअर मधील विविध पर्याय आणि अभ्यासक्रमाविषयी तरुण-तरुणींना तसेच विद्यार्थ्यांना रोजगार, व्यवसाय तसेच करिअर संबंधी मार्गदर्शन केले. दहावी नंतरच्या शिक्षणाच्या विविध संधी, बारावी नंतरच्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा, व्यक्तिमत्व विकास यासोबतच इतर विविध विषयांबाबतही पवार यांनी मार्गदर्शन केले.

याप्रसंगी माजी नगरसेवक दिपक पवार, निलेश म्हात्रे, माजी नगरसेविका सुरेखा नरबागे, ज्येष्ठ कार्यकर्ते गोपाळराव गायकवाड, डॉ. राजेश पाटील, विजय घाटे, दत्ता घंगाळे, राजेश रॉय, विकास सोरटे, समाजसेवक पांडुरंग आमले, सुहासिनी नायडू, जयश्री चित्रे, आरती राऊल, संदेश पाटील, संजय ओबेरॉय यांच्यासह असंख्य विद्यार्थी आणि तरुण-तरुणी उपस्थित होत्या.

युवा पिढीच्या समस्या आणि त्यांचे प्रश्न जाणून घेणे. तरुणांना रोजगार संदर्भात योग्य मार्गदर्शन देवून त्यांना व्यवसायामध्ये प्रोत्साहित करणे आणि युवा शक्तीला बळकटी देणे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा एकच ध्येय आहे. तसेच शिबिराच्या माध्यमातून तरुण-तरुणींना तसेच विद्यार्थ्यांना रोजगार संदर्भात योग्य ते मार्गदर्शन आणि योग्य ती माहिती असणे आवश्यक असल्याचा संदेश देण्यात आला. तसेच मी आमदार झाल्यापासून आजवर विविध घटकातील ५०० गोर-गरीब तरुणांना कामावर लावले असून ते आज व्यवस्थितरित्या कामावर रुजू आहेत. -आमदार सौ. मंदाताई म्हात्रे, बेलापूर.

 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

प्रतिक गोंधळी  उमेदवारामुळे इंडिया आघाडीच्या मातब्बर उमेदवारासमोर आव्हान