प्रतिक गोंधळी  उमेदवारामुळे इंडिया आघाडीच्या मातब्बर उमेदवारासमोर आव्हान 

चिरनेर ग्रामपंचायतीची निवडणूक येत्या ५ नोहेंबर रोजी 

उरण :उरण तालुक्यातील प्रतिष्ठित समजलेल्या चिरनेर ग्रामपंचायतीची निवडणूक येत्या ५ नोहेंबर रोजी होणार असून इंडिया आघाडी विरोधात भाजपा असा या निवडणूकीत सामना होणार आहे. भाजपाने या निवडणूकीत नवखे तरूण उमेदवार प्रतिक गोंधळी यांना उमेदवारी दिली असून इंडिया आघाडीतर्फे शिवसेनेचे (उबाठा)गटाचे, माजी उरण पंचायत समितीचे सभापती भास्कर मोकल यांना उमेदवारी दिली आहे. भास्कर मोकल यांच्या सोबत गावातील सर्व मातब्बर पुढारी असून प्रतिक गोंधळी यांच्या सोबत तरूणांची फौज आहे.            

  चिरनेर ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि १५ सदस्यांसाठी ही निवडणूक होत असून या निवडणूकीत ४ हजार ८०७ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मागील निवडणूकीत येथे काँग्रेस आघाडीचे संतोष चिर्लेकर यांनी भास्कर मोकल यांचा पराभव केला होता. मात्र आत्तात्याच काँग्रेस –शेकाप आघाडीने शिवसेने सोबत आघाडी केली असून भास्कर मोकल यांना पाठिंबा दिला आहे.  मागील पाच वर्षात गावातील खराब झालेले रस्ते आणि रस्त्यांवरून वाहणारी गटारे यामुळे नागरीकांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे आणि त्यांच्या सोबतच आघाडी केल्यामुळे त्याचा फटका भास्कर मोकल यांना बसण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे भाजपाने प्रतिक गोंधळी या फ्रेश तरूणाला थेट सरपंच पदाच्या निवडणूकीत उभा केल्यामुळे त्याला नागरीकांकडून सहानभूती मिळत आहे. राजकारणात नवखे असले तरी गावातील कौटूंबिक नाती आणि मित्रत्वाचे संबध ही प्रतिक गोंधळी यांची जमेची बाजू आहे.            

भास्कर मोकल यांचा मागील निवडणूकी पराभव झाल्यानंतर त्यांनी पुन्हा निवडणूकीत न उतरण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आघाडीच्या नेत्यांनी त्यांना परत या निवडणूकीत उतरविले आहे त्यामुळे इंडिया आघाडीच्या नेत्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. या उलट प्रतिक गोंधळी यांच्या विजयासाठी स्थानिक तरूण आणि आमदार महेश बालदी,आमदार प्रशांत ठाकूर, उद्योजक पी.पी. खारपाटील, उद्योजक राजेंद्र खारपाटील हे उत्स्फूर्त प्रयत्न करत आहेत. मागील पाच वर्षात गावात खुंटलेला विकास, फुटलेले रस्ते आणि वर्षभर रस्त्यावरून वाहणारी गटारे सत्ताधाऱ्यांना बंद करता आली नाहीत. उलट त्यांच्याच खांद्याला खांदा लावून प्रतिस्पर्धी उमेदवार निवडणूकीत मते मागत आहेत ही शोकांतिका आहे. मी निवडून आल्यानंतर आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्या सहकार्याने ही कामे प्राधान्याने करणार, येथे येणाऱ्या प्रकल्पांमध्ये स्थानिक तरूणांना सामाऊन घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिक गोंधळी यांनी सांगितले.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

मराठा आरक्षणाबाबत संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा