भंगार डेपोच्या अग्नितांडवाला जबाबदार कोण?

उरण : ‘उरण नगरपरिषद'च्या हद्दीत बोरीनाका येथे अनधिकृत भंगाराच्या गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना नुकतीच घडली आहे. या आगीत घटनास्थळी बाजला राहणारे परेश तेरडे यांच्या घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे बाजुला असलेल्या झोपडपट्टीतील काही घरे जळून खाक झाली आहेत. सदर आग संपूर्ण आटोक्यात आणण्यासाठी १२ तासांचा कालावधी लागला.

त्यामुळे सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ‘रायगड जिल्हा काँग्रेस कमिटी'चे अध्यक्ष महेंद्र घरत यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सदर ठिकाणी झालेल्या नुकसानीचा आढावा घेत नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळावी म्हणून शासनाकडे मागणी करण्यात येणार आहे. आग नुकसानग्रस्तांना त्वरित भरपाई मिळावी यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे महेंद्र घरत यांनी यावेळी सांगितले.

याप्रसंगी ‘इंटक'चे रायगड जिल्हा अध्यक्ष किरीट पाटील, ‘काँग्रेस'चे शहराध्यक्ष प्रकाश पाटील, विधानसभा क्षेत्र महिला अध्यक्षा संध्या ठाकूर, सदानंद पाटील, दीपक ठाकूर, रेखा धनसरे, वंदना ठाकूर, वंदना म्हात्रे, आदि उपस्थित होते. 

 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

‘भाजपा'तर्फे रोजगार मार्गदर्शन शिबिराचे आयोजन