‘मनसे'च्या टोलनाका देखरेख कक्षाला शर्मिला ठाकरे यांची भेट

पदाधिकाऱ्यांकडून जाणली टोलनावयावरील वाहन मोजणी प्रक्रिया

नवी मुंबई : ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना'चे अध्यक्ष राज ठाकरे यांची पत्नी सौ. शर्मिला ठाकरे यांनी २८ ऑवटोबर रोजी ‘मनसे'तर्फे सीवुडस्‌ येथे उभारण्यात आलेल्या टोलनाका देखरेख कक्षाला भेट दिली.

वाशी टोल नाका येथे लावण्यात आलेल्या १२ सीसीटीव्हीचे थेट प्रक्षेपण ‘मनसे'ने सीवुडस्‌ येथे देखरेख कक्ष उभारुन केले आहे. येथे २४ तास ‘मनसे'चे पदाधिकारी वाहनांची मोजणी करत आहेत. सदर सर्व प्रक्रियेची संपूर्ण माहिती सौ. शर्मिला ठाकरे यांना ‘मनसे'चे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे आणि इतर पदाधिकाऱ्यांकडून समजून घेतली.

या भेटीदरम्यान सौ. शर्मिला ठाकरे यांनी टोल नाक्यावरील असुविधांचा पाढाच वाचून दाखवला. जर सरकारने मनात आणले मुंबईच्या एन्ट्री पॉईंट वरील टोलनाक्यांवरील आतापर्यंतच्या टोल वसुलीच्या पैशातून संपूर्ण महाराष्ट्रातील रस्ते काँक्रीटचे होवू शकतात. एकंदरीतच सौ. शर्मिला ठाकरे यांनी टोल वसुली संदर्भात सरकारच्या उदासीन कारभारावर ताशेरे ओढले.

याप्रसंगी ‘मनसे'चे रायगड जिल्हा अध्यक्ष संदेश ठाकूर, चेंबूर विधानसभा अध्यक्ष माऊली थोरवे, नवी मुंबई उपशहर अध्यक्ष सविनय म्हात्रे, शहर सचिव विलास घोणे, सचिन कदम, शहर सहसचिव अभिजीत देसाई, दिनेश पाटील, महिला सेना शहर अध्यक्ष डॉ. आरती धुमाळ, वाहतूक सेना सरचिटणीस नितीन खानविलकर, विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष संदेश डोंगरे, रस्ते आस्थापना शहर अध्यक्ष संदीप गलुगडे, रोजगार विभाग शहरअध्यक्ष सनप्रीत तुर्मेकर, चित्रपट सेना शहर संघटक अनिकेत पाटील, महिला सेना उपशहर अध्यक्ष सोनिया धानके, मनसे विभाग अध्यक्ष भूषण कोळी, सागर विचारे, अमोल आयवळे, उमेश गायकवाड, सुहास मिंडे, विशाल चव्हाण यांच्यासह ‘मनसे'चे इतर पदाधिकारी, महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

 मतदारयादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण सुधारित कार्यक्रम जाहीर