‘मनसे'च्या मॉनिटरींग रुमची संदीप देशपांडे यांच्याकडून पाहणी

वाशी टोलनावयावर ‘मनसे'तर्फे सीसीटिव्ही कॅमेरे तैनात

नवी मुंबई ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना'चे नेते तथा प्रववते संदीप देशपांडे यांनी २१ ऑक्टोंबर रोजी सीवुडस्‌ येथे ‘मनसे'ने उभारलेल्या देखरेख कक्षाला  भेट दिली.

वाशी टोल नाका येथे लावण्यात आलेल्या १२ सीसीटीव्हीचे थेट प्रक्षेपण ‘मनसे'ने सीवुडस्‌ येथे देखरेख कक्ष उभारुन केले आहे. येथे २४ तास ‘मनसे'चे पदाधिकारी वाहन मोजणी करीत आहेत.

या सर्व प्रक्रियेची संपूर्ण माहिती संदीप देशपांडे यांनी गजानन काळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांमार्फत समजून घेतली. याप्रसंगी ‘मनसे'चे चेंबूर विधानसभा अध्यक्ष माऊली थोरवे, नवी मुंबई उपशहर अध्यक्ष सविनय म्हात्रे, शहर सचिव विलास घोणे, सचिन कदम, शहर सह सचिव अभिजित देसाई, दिनेश पाटील, विभाग अध्यक्ष अक्षय भोसले, आदि उपस्थित होते. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

भूमिपुत्रांच्या मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलन