दिघोडे ग्रामपंचायत निवडणूक; उमेदवारी अर्ज दाखल

भाजप-सेना-शेकाप-राष्ट्रवादी ग्रामविकास आघाडी रिंगणात

उरण : सरपंच पदासाठी मयूर घरत मैदानातसरपंच पदासाठी मयूर घरत मैदानात दिघोडे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी भाजप-सेना-शेकाप-राष्ट्रवादी ग्रामविकास आघाडी तर्फे थेट सरपंच पदासाठी मयूर बाळकृष्ण घरत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी आघाडी तर्फे प्रभाग क्रमांक-१ मधून सौ. ललिता जगदीश कोळी, सौ. रुपाली रोहन कोळी, रितेश लक्ष्मण कोळी, प्रभाग क्रमांक-२ मधून निलेश बामा पाटील, सौ. पूजा अभिजित पाटील, सौ. श्रध्दा गणेश म्हात्रे, प्रभाग क्रमांक-३ मधून समीर गजानन ठाकूर, सौ. पूजा संदिप पाटील, सौ. लक्ष्मी हरजीवन ठाकूर यांनी उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी पालव यांच्याकडे दाखल केले.

याप्रसंगी आमदार महेश बालदी, उरण तालुका भाजप अध्यक्ष रवी भोईर, सुनिल पाटील, विजय भोईर, प्रसाद पाटील, अनिल पाटील, अनिल पाटील, रमण कासकर, काशीनाथ रामा पाटील, प्रल्हाद कासकर, आश्विन पाटील, रमेश उर्फ नाना पाटील, गाव अध्यक्ष राजेश पाटील, उरण तालुका भाजप किसानअध्यक्ष पांडुरंग पाटील, राकेश म्हात्रे आदींसह ग्रामविकास आघाडी'चे कार्यकर्ते उपस्थित होते. 

 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

‘काँग्रेस'तर्फे ‘सिडको'च्या व्यवस्थापकीय संचालकांना चॉकलेटचा पुष्पगुष्छ भेट