‘टोल'चा झोल!

‘मनसेे'च्या काही मागण्यांवर त्वरित अंमलबजावणी, काही मागण्यांबाबत महिनाभरात निर्णय -ना.भुसे

मुंबई : टोलचा मुद्द्यावरुन सातत्याने महाराष्ट्र सरकारला धारेवर धरणारे ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना'चे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टोलच्या झोलची पोलखोड केली आहे. राज ठाकरे यांनी मंत्री दादा भुसे यांच्या समवेत १३ ऑवटोबर रोजी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन टोल संदर्भातील होणाऱ्या बदलांची सविस्तर माहिती दिली. दरम्यान, राज ठाकरे यांनी  केलेल्या काही मागण्यांबाबत आजच अंमलबजावणी करण्यात येईल तर काही मागण्यांबाबत महिनाभरात निर्णय घेतला जाईल, असे ना. दादा भुसे यांनी सांगितले.

यानुसार आता दिवसभरातटोल किती वसूल झाला आहे? किती बाकी आहे? याची माहिती आता प्रदर्शित केली जाणार आहे. त्याचबरोबर जुने टोल बंद करण्यासंदर्भातील मागणी ‘मनसेे'तर्फे राज्य सरकारकडे आणण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने ‘पीडब्ल्युडी'चे २९ आणि ‘एमएसआरडीसी'चे १५ जुने टोल बंद करा, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यावर राज्य सरकारच्या वतीने ना. दादा भुसे यांनी या संदर्भात विचार करुन निर्णय घेऊ असे म्हटले आहे.

तर ‘पीडब्ल्युडी'चे २९ आणि ‘एमएसआरडीसी'चे १५ जुने टोल बंद करण्याची मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली आहे. तर राष्ट्रीय महामार्गावरील टोल बाबत वेंÀद्रित मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती राज ठाकरे यांनी यावेळी दिली.

राज ठाकरे आणि राज्य शासन यांच्यात ठरल्यानुसार पुढील १५ दिवसात मुंबईतील सर्व एन्ट्री पॉईंटस्‌वर सरकार आणि ‘मनसेे'कडून कॅमेरे लावले जाणार आहेत. त्यामुळे त्या टोल मार्गावरुन किती गाड्या जातात, ते समजेल. दुसरीकडे राज ठाकरे यांच्याकडून टोल बंद करण्यात संदर्भात मागणी करण्यात आली आहे. त्यावर निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारने एक महिन्याचा अवधी मागितला आहे. राज ठाकरेंकडून जुने टोल बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे.

टोल संदर्भातील निर्णयः
टोल किती वसूल झाले याची माहिती दोन्ही बाजुने दिली जाणार
दिवसभरात किती जमा झाली याची माहिती सुध्दा मिळणार
आनंद नगर ते ऐरोली यादरम्यानचा टोल एकदाच भरावा लागणार. तो दोनदा भरण्याची आवश्यकता नाही. या निर्णयाची एक महिन्यात अंमलबजावणी होणार
जुने टोल बंद करण्यासंदर्भात महिनाभरात निर्णय घेणार
पुढील १५ दिवसात मुंबईतील सर्व एन्ट्री पॉईंटस्‌वर सरकार आणि ‘मनसेे'चे कॅमेरे लावले जातील.
रुग्णवाहिका, स्वच्छतागृह , सीसीटीव्ही कंट्रोल मंत्रालयात असेल तिथे लोकांना काय त्रास होताय ते कळेल
करारामधील नमूद उड्डाणपुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट आयआयटी मुंबईकडून केले जाणार
५ रुपये वाढीव टोल बाबत एक महिन्याचा अवधी सरकारला हवा, त्यानंतर रद्द करण्याचा निर्णय घेतला जाईल
टोलनाक्यांवर स्वच्छतागृहांची सोय असावी
टोल कर्मचाऱ्यांनी नागरिकांशी सौजन्याने वागावे
रस्ते खराब असल्यास टोल भरला जाणार नाही
टोलनाक्यांजवळ राहणाऱ्यांसाठी सवलतीचा पास मिळावा
पिवळ्या रेषेमागे चार मिनिटे वाहन थांबल्यास टोल भरला जाणार नाही
वांद्रे सी-लिंक, एक्स्प्रेस-वे टोलची कॅगकडून चौकशी व्हावी
वाढीव टोल रद्द करण्यासाठी एक महिन्याची मुदत. 

 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

कायम, ठोक, कंत्राटी कर्मचारी अधिकाऱ्यांच्या समस्या सोडविण्याची मागणी