ज्येष्ठांच्या संतापाची महापालिका कडून दखल
शौचालय अस्वच्छता प्रकरणी पेट्रोलपंप चालकाला दणका
नवी मुंबई : जुईनगर, सेक्टर-२४ मधील पेट्रोलपंपावरील शौचालय अस्वच्छता प्रकरणी जुईनगर मधील ज्येष्ठ नागरिकांच्या असंतोषाचा भडका उडाला आणि याची झळ सदर पेट्रोलपंप चालकाला बसली. सदरचे प्रकरण महापालिका पर्यत प्रकरण गेल्यावर स्वच्छता अधिकारी इंगळे यांनी घटनास्थळी येवून पेट्रोलपंप चालकाला शौचालय अस्वच्छतेबाबत धारेवर धरत शौचालय कायमस्वरुपी स्वच्छ ठेवण्याचे निर्देश दिले.
जुईनगर, सेक्टर-२४ मधील चौकात एचपी कंपनीचे पेट्रोलपंप आहे. या ठिकाणी सुरुवातील पहिल्या मजल्यावर ग्राहकांसाठी सार्वजनिक शौचालय होते. परंतु, स्वच्छता अभियांन अंतर्गत पेट्रेालपंपावरील शौचालये सर्वसामान्यांनाही खुली करण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. त्यानुसार पेट्रोलपंप चालकाने पहिल्या मजल्यावरील शौचालय तळमजल्यावर आणले आहे. जुईनगरच्या चौकात सकाळपासून रात्री उशिरापर्यत नागरिकांची वर्दळ असते. विशेष म्हणजे या चौकात ज्येष्ठ नागरिकांचा राबता मोठ्या संख्येने आहे. ज्येष्ठ नागरिक या चौकात बाकड्यावर बसलेले असतात. ते शौचासाठी अथवा लघुशंकेसाठी पेट्रोलपंवरील सार्वजनिक शौचालयाचा वापर करतात. शौचालयातील अस्वच्छतेमुळे, दुरावस्थेमुळे ज्येष्ठ नागरिक त्रस्त झाले होते. पेट्रोलपंप चालक शौचालय दुर्गंधीत असतानाही स्वच्छतेबाबत कार्यवाही करत नसल्याने १३ ऑवटोबर रोजी सकाळी जुईनगरमधील ज्येष्ठ नागरिकांच्या संयमाचा स्फोट झाला. शौचालयाच्या अस्वच्छतेबाबत ज्येष्ठांनी महापालिका प्रशासनाशी संपर्क साधून तक्रार केली.
ज्येष्ठांचा सूर आणि संतापाचा उद्रेक पाहून महापालिका स्वच्छता अधिकारी इंगळे यांनी जुईनगरच्या पेट्रोलपंपावर धाव घेतली. यावेळी ज्येष्ठांनी कामगार नेते रविंद्र सावंत यांनाही घटनास्थळी पेट्रोलपंपावर बोलविले. महापालिका अधिकारी इंगळे यांनी पेट्रोलपंपावरील अस्वच्छतेबाबत पेट्रोलपंप चालकाला धारेवर धरत शौचालय स्वच्छतेचे निर्देश दिले. यावेळी
ज्येष्ठांच्या वतीने ‘ज्येष्ठ नागरिक संघ'चे माजी अध्यक्ष अंकुश नलावडे, महाडेश्वर, देसाई बुवा, कांबळे यांनी आपली भूमिका मांडली. दरम्यान,ज्येष्ठांच्या संतापाची महापालिका प्रशासनाला दखल घ्यावी लागली.