‘शिवसेना'च्या ‘होऊ दे चर्चा' अभियानाला उरणकरांचा प्रतिसाद

माजी आमदार मनोहर भोईर, माजी नगराध्यक्ष गणेश शिंदे यांची प्रमुख उपस्थिती

उरण : केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या घोषणांचा पर्दाफाश करण्यासाठी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने ‘होऊ दे चर्चा' अभियान संपूर्ण महाराष्ट्रभर राबवला जात आहे. याचाच एक भाग म्हणून शिवसेना उरण शहरच्या वतीने मोरा, भवरा, मुस्लिम मोहला आणि शहर शाखा येथे ८ ऑक्टोबर रोजी सदर अभियान राबवण्यात आले.
यावेळी ‘शिवसेना'चे जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर, माजी नगराध्यक्ष गणेश शिंदे, नगरसेविका अँड. वर्षा पठारे, सोशल मिडीया समन्वयक नितीन ठाकूर यांनी केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या बोल घेवड्या योजनांचा पर्दाफाश केला. यामध्ये गॅसचे दर, पेट्रोल-डिझेलचे दर,महागाई, जीवनावश्यक वस्तुंचे गगनाला भिडलेले दर, बेकारी, स्थानिक आमदारांचे सर्व पातळीवरील अपयश, नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नामकरणाचा प्रश्न यासह दोन्ही सरकारांनी केलेल्या फसव्या घोषणांचा आपल्या मनोगतातून पर्दाफाश केला.

याप्रसंगी उरण शहरप्रमुख विनोद म्हात्रे, संपर्कप्रमुख गणेश म्हात्रे, शहर संघटक दिलीप रहाळकर, उपशहरप्रमुख कैलास पाटील, अरविंद पाटील, नगरसेवक अतुल ठाकूर, निलेश भोईर, माजी शहर संघटक महेश वर्तक, ‘महिला आघाडी'च्या तालुका संघटिका (शहर) सुजाता गायकवाड, संपर्क संघटिका वंदना पवार, शहर संघटिका मेघा मेस्त्री, उपतालुका संघटिका मनिषा ठाकूर, उपशहर संघटिका रझिया शेख, माधुरी चव्हाण, अल्पसंख्यांक सेल शहराध्यक्ष मुमताज भाटकर, तालुकाध्यक्ष हुसेना शेख, रुबिना कुट्टी, सायरा खान, कविता गाडे, लोळगे, हसीमा सरदार, रुकसाना सय्यद, अश्विन गवस, ‘ग्राहक संरक्षण कक्ष'चे शहर संघटक संदीप जाधव, शाखाप्रमुख विकी म्हात्रे, राकेश कोळी, अजय म्हात्रे, इस्माईल शेख, कफील फसाटे, फतेह खान, सहीम शेख, शाहरुख गडी, प्रदीप शेळके, संतोष पाटील, रुपेंद्र गुडेकर, दर्शन जळगांवकर,  संदेश पाटील, हेमंत कोळी, प्रशांत कोळी, नंदू कोळी, माळी तसेच इतर सर्व उपशाखाप्रमुख, गटप्रमुख, बुथप्रमुख, युवासेना पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते. 

 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

 ज्येष्ठांच्या संतापाची महापालिका कडून दखल