तर आम्ही सर्व टोलनाके जाळून टाकू

लहान वाहनांना टोलमाफीसाठी ‘मनसे'चे सैनिक प्रत्येक टोलवर तैनात

नवी मुंबई : टोलच्या पैशांमधील झोलवरुन ‘मनसे'चे अध्यक्ष राज ठाकरेंनी ९ ऑवटोबर रोजी पुन्हा एकदा ‘लाव रे तो व्हिडीओ'चा  नाद छेडला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी कार, रिक्षा, टु व्हीलर या लहान वाहनांना राज्यात टोलमुवती असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्यानुसार कार, रिक्षा, टु व्हीलर यांना टोल माफी असेल तर ‘मनसे'चे सैनिक प्रत्येक टोलवर उभे राहून या लहान वाहनांना टोल आकारु देणार नाहीत. आणि जर तसे झाले नाही तर आम्ही सर्व टोलनाके जाळून टाकू, असा गंभीर इशाराही राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदच्या माध्यमातून संबंधितांना  दिला आहे.

राज्यात टोलच्या पैशांचे नवकी होते काय? त्याच त्याच कंपन्यांना टोलची कंत्राटे कशी मिळतात? असा सवाल करतानाच राज ठाकरे यांनी आता पुन्हा एकदा टोलविरोधी अस्त्र उगारले आहे. पत्रकार परिषद मध्ये राज ठाकरे यांनी अजित पवार यांचे टोलमुक्तीचे भाषण, ‘मनसे'च्या आंदोलनानंतर उध्दव ठाकरे यांनी केलेली घोषणा तसेच लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे टोल माफी देण्याविषयीचे भाषण दाखविले. त्याचबरोबर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची टोल माफीसंदर्भातील दोन व्हिडीओ यावेळी माध्यमांना दाखवले. यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात टोलमाफी देण्यात आली असून फक्त मोठ्या कमर्शिअल वाहनांंनाच टोल आकारला जात असल्याचे सांगितले होते. जर सदर बाब खरी खरे आहे का? असा मुद्दा उपस्थित करतानाच जर तुम्ही कार घेऊन जात असताना टोल भरावा लागत असेल तर देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या घोषणेप्रमाणे कार, रिक्षा, टु व्हीलर यांना टोल माफी मिळण्यासाठी ‘मनसे'चे सैनिक प्रत्येक टोलवर उभे राहून लहान वाहनांना टोल आकारु देणार नाहीत, असे राज ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

तरीही लहान वाहनांना टोल आकारणी केली जात असेल तर आम्ही सर्व टोलनाके जाळून टाकू, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे. तसेच येत्या दोन दिवसांत मी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. तुम्ही माघार का घेतली? आताच्या सरकारवर दबाव आहे का? कोणाच्या उत्पन्नाचे साधन आहे का? याची उत्तरे मला पुढील दोन-तीन दिवसांत मिळतील. टोलचे पैसे राज्य सरकारने घेतलेत का? जर घेतले असतील तर लोकांना चांगले रस्ते का मिळत नाहीत, असा सवालही राज ठाकरे यांनी शेवटी उपस्थित केला. 

 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

सी-लिंक बाधित मच्छीमारांना दिवाळी भेट