आ. मंदाताई म्हात्रे यांनी घेतली उपोषणकर्त्या साफसफाई कर्मचाऱ्यांची भेट

सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांची लवकरच सोडवणूक -अतिरिवत आयुवत म्हसाळ

नवी मुंबई : आपले नवी मुंबई शहर स्वच्छतेमध्ये देशात नेहमीच आघाडीवर राहिले आहेत. तसेच शहरात मोठ्या संख्येने वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत साफसफाई कर्मचारी आपले काम चोख पध्दतीने पार पाडत असतात. परंतु, स्वच्छता कर्मचाऱ्यांचे प्रश्न आणि समस्या जाणून घेण्यास कोणीही पुढाकार घेत नाही. त्याअनुषंगाने ‘बेलापूर'च्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी नवी मुंबई महापालिका महापालिका मुख्यालयाजवळ गेले दिवस ‘समाज समता कामगार संघ'च्या झेंड्याखाली आपल्या न्याय मागण्यांकरिता आमरण उपोषणाला बसलेल्या साफसफाई कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्या आणि प्रश्न जाणून घेतले.

सर्व साफसफाई कर्मचारी गोरगरीब आणि विविध घटकातील कर्मचारी असून ते आपआपले कर्तव्य नियमितपणे बजावत आहेत. याच साफसफाई कर्मचाऱ्यांमुळे महापालिकेला स्वच्छतेमध्ये देशात पारितोषिके मिळत असून याच साफसफाई कर्मचाऱ्यांमुळेच नवी मुंबई महापालिका स्वच्छतेमध्ये देशात नेहमीच आघाडीवर राहिली आहे, याचा नवी मुंबई महापालिकेला विसर पडला आहे, असे आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.

 त्यामुळे साफसफाई कर्मचारी त्यांच्या न्याय हक्कासाठी गेल्या ३ दिवसांपासून उपोषणाला बसले असल्याचे समजताच आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी त्यांची ६ ऑवटोबर रोजी भेट घेतली. यावेळी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर शासकीय कामाकरिता दौऱ्यावर असल्याने ते कार्यालयात रुजू होताच पहिली बैठक ‘समाज समता कामगार संघ'च्या साफसफाई कर्मचाऱ्यांची असेल आणि त्यासाठी साफसफाई कर्मचाऱ्यांना न्याय देण्याचा पूर्णपणे माझा प्रयत्न असेल. सफाई कर्मचाऱ्यांना ठोक मानधन मिळविण्याचा देखील प्रयत्न करेन, अशी ग्वाही दिली. तसेच त्यांनी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार म्हसाळ साहेब यांना दूरध्वनीद्वारे संपर्क करुन सफाई कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत संपूर्ण माहिती दिला. त्यावर अतिरिवत आयुवत म्हसाळ यांनी सकारात्मकता दाखवत सफाई कर्मचाऱ्यांचे प्रश्न लवकरात लवकर सोडविण्यात येतील, असे आश्वासन दिले.

याप्रसंगी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या समवेत ‘समाज समता कामगार संघ'चे सरचिटणीस मंगेश लाड, अध्यक्ष (नवी मुंबई) गजानन भोईर, उपाध्यक्ष संतोष पाटील, महेंद्र पाटील, सुभाष साळुंखे तसेच ‘संघ'चे पदाधिकारी आणि उपोषणकर्ते सफाई कामगार उपस्थित होते.

‘समाज समता कामगार संघ'तर्फे देण्यात आलेल्या पत्रामधी नमूद मागण्यांनुसार जे कामगार सेवानिवृत्त झाले आहेत त्यांची सेवा उपदानाची रक्कम (ग्रॅज्युईटी) त्वरित अदा करण्यात यावी, उद्यान विभागातील कामगारांची २०२० पासूनची विशेष राहणीमान भत्यातील थकबाकी कामगारांना त्वरित अदा करण्यात यावी अशा अनेक विविध मागण्यांचे निराकरण करुन त्यावर तोडगा निघेल. यासंदर्भात दिवाळी सणापूर्वीच साफसफाई कर्मचाऱ्यांना गोड भेट देणार -आमदार सौ. मंदाताई म्हात्रे, बेलापूर.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

ग्रामपंचायत निवडणुकीचे वाजले बिगुल वाजले