भाजप उत्तर रायगड जिल्हा कार्यकारिणीची बैठक संपन्न

प्रत्येक निवडणुकीत ‘भाजप'चा झेंडा फडकला पाहिजे -आ. प्रशांत ठाकूर

पनवेल : स्थानिक स्वराज्य संस्था पासून ते लोकसभा निवडणुकीत अर्थात प्रत्येक निवडणुकीत ‘भाजप'चा झेंडा फडकला पाहिजे. आणि त्यासाठी ‘भाजप'शिवाय पर्याय नाही, अशी स्थिती निर्माण झाली पाहिजे अशा रितीने प्रत्येक कार्यकर्त्यांनी काम करावे, असे आवाहन मावळ लोकसभा प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले.

भाजप उत्तर रायगड जिल्हा कार्यकारिणीची बैठक आमदार प्रशांत ठाकूर, आमदार निरंजन डावखरे आणि उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील मार्केट यार्ड येथे ‘मेरी माटी मेरा देश', सेवा पंधरवडा, पदवीधर मतदार नोंदणी आणि सरल ॲप या विषयांच्या अनुषंगाने १५ सप्टेंबर रोजी पार पडली. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या माध्यमातून लोककल्याणकारी विविध योजना अंमलात आणून देशाला प्रगतीपथावर आणले आहे. पक्षाने दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडणे आपले कर्तव्य आहे, त्यामुळे ती पार पाडावी, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी केले. तसेच सेवा पंधरवडा, मेरी माटी मेरा देश, पदवीधर मतदार नोंदणी आणि सरल अँप अशा विषयासंदर्भात उपस्थित पदाधिकाऱ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी ‘मेरी माटी मेरा देश' अभियानाचे प्रदेश संयोजक आमदार निरंजन डावखरे यांनी पदवीधर मतदार नोंदणी संदर्भात तर जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी सरल ॲप आणि संघटनात्मक जबाबदारी या विषयी मार्गदर्शन केले. जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील यांनी ‘मेरी माटी मेरा देश' अभियान नियोजनासंदर्भात तर जिल्हा सरचिटणीस ॲड. प्रकाश बिनेदार यांनी सेवा पंधरवडा विषयी माहिती दिली.

सदर बैठकीस ‘भाजप'च्या जिल्हा सरचिटणीस चारुशीला घरत, जिल्हा उपाध्यक्ष वसंत भोईर, जयंत पगडे, रामदास ठोंबरे, निळकंठ घरत, वि्ील मोरे, माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, प्रिया मुकादम, सुभाष कदम, सनी यादव, चिटणीस चंद्रकांत घरत, ज्ञानेश्वर घरत, रमेश मुंडे, ब्रिजेश पटेल, विद्या तामखडे, किर्ती नवघरे, प्रदीप देशमुख, कोषाध्यक्ष अभिलाषा ठाकूर, पनवेल तालुका मंडल अध्यक्ष अरुणशेठ भगत, सरचिटणीस राजेंद्र पाटील, पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, कर्जत मंडल अध्यक्ष राजेश भगत, रमेश रेटरेकर, प्रवीण मोरे, रवी भोईर, रवींद्र जोशी, रविनाथ पाटील, खारघर मंडल अध्यक्ष प्रवीण पाटील, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष अमित जाधव, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष राजेश गायकर, आदिवासी मोर्चा जिल्हाध्यक्ष बंडू शिद,  फ्रेंडस्‌ ऑफ बीजेपी संयोजक नितीन कांदळगावकर, आध्यात्मिक समन्वय आघाडी संयोजक काशिनाथ पारठे, सोशल मिडीया सेल संयोजक गायत्री परांजपे, आयटी सेल नितेश सोळंकी, बबन बारगजे, अभिषेक पटवर्धन, सुधीर घरत, गीता चौधरी, ज्योती देशमाने, आरती तायडे, कमल कोठारी, संतोष शर्मा, मंदार मेहेंदळे, के.सी.पाटील, राजेंद्र अग्रवाल, विनोद नाईक, उपेंद्र मराठे, राजेश कदम, अमरीश मोकल, प्रसाद हनुमंते यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. 

 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

मोरबे धरणावर विनापरवानगी जलपुजन