‘बेलापूर'मध्ये ‘मेरी माती मेरा देश' अभियानाला सुरुवात

आ. मंदाताई म्हात्रे यांच्या निवासस्थानी ‘अभियान'चा शुभारंभ

नवी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेला ‘मेरी माती मेरा देश' अभियान संपूर्ण भारतभर सुरु झाला आहे. त्याअनुषंगाने ‘बेलापूर' मतदारासंघामध्ये आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या निवासस्थानापासून ‘मेरी माती मेरा देश' अभियानाला १५ सप्टेंबर रोजी सुरुवात झाली आहे.

 सरकारने ‘एक भारत, श्रेष्ठ भारत' या भावनेने दिल्ली आणि ७,५०० गावांमध्ये देशी आणि स्थानिक वनस्पतींचे उद्यान उभारण्यासाठी ‘अमृत वाटिका' योजना सुरु केली आहे. ‘मेरी माती मेरा देश' अंतर्गत देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या शूरवीर आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मरणार्थ प्रत्येक राज्यातील शहरामध्ये ‘शिलाफलकम' स्मृती फलकही लावण्यात येणार आहे, असे आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले. ‘हर घर तिरंगा' अभियानाच्या यशानंतर सरकारने ‘आझादी का अमृत महोत्सव अंतर्गता' एक महत्त्वाकांक्षी सहभागात्मक कार्यक्रम आणला आहे. मार्च २०२१ रोजी ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव'ला सुरुवात असून  शूरवीरांना श्रध्दांजली, ‘मिट्टी का नमन' आणि ‘वीराें का वंदन' असे '‘मेरी माती मेरा देश' अभियानाचे मुख्य घटक आहेत.

‘भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव'च्या पार्श्वभूमीवर देशासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना नमन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार ‘मेरी माती मेरा देश' अभियानात सर्व नवी मुंबईकर सहभागी झाले आहेत. भारतमातेच्या वीरांप्रती असलेली कृतज्ञता अभिमान व्यक्त करत १५१-बेलापूर विधानसभा मतदारसंघांतील नागरिक या अभियानात मोठ्या संख्येने सहभागी झालेे. या अभियानांतर्गत घराघरातून माती गोळा केली जात आहे. या मातीच्या माध्यमातूनच अमृत वाटिकेची निर्मिती करण्यात येणार आहे. मी देखील या अभिनायात सहभागी होऊन शहीद झालेल्या वीरांना श्रध्दांजली अर्पण करत मातृभूमीला वंदन केले. यावेळी सर्वांनी पंचप्रण शपथही घेतली, असे आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.

याप्रसंगी बेलापूर विभाग अधिकारी शशिकांत तांडेल, क्रीडा अधिकारी अभिलाशा म्हात्रे, दिलीप वैद्य, राजेश पाटील, श्याम पाटील, विनोद म्हात्रे, दर्शन बहारद्वाज, संतोष पळसकर, गोपाळराव गायकवाड, दामोदर पिल्ले, संजय ओबेरॉय, भूषण पाटील, निलेश पाटील, आरती राऊळ, अलका कामत, किरण वर्मा, गणेश पाटील, सागर शेटे, बंटी शिंदे, किरण झेंडे यांच्यासह इतर कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

भाजप उत्तर रायगड जिल्हा कार्यकारिणीची बैठक संपन्न