ठाणे लोकसभा मतदार संघातील ओळख न पटलेले अडीच लाख मतदार

खासदार राजन विचारे यांची जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

ठाणे : जिल्हाधिकारी कार्यालयात सर्वपक्षीय झालेल्या बैठकीत निवडणूक अधिकारी उर्मिला पाटील यांनी १४८-ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातील ओळख न पटलेल्या किंवा वास्तव्य पत्यावर न सापडलेल्या १ लाख २५ हजार मतदारांची नावे सर्वच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींकडे सोपविली आहेत. त्यामध्ये ठाणे शहर विधानसभा या मतदार संघातील १ लाख २५ हजार मतदारांचा अधिक उच्चांक गाठला आहे. सदर बाब खासदार राजन विचारे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तत्काळ ठाणे लोकसभाचे संपर्क प्रमुख मधुकर देशमुख आणि १४८-ठाणे विधानसभा सचिव संजीव कुलकर्णी यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले आहे.

२५ ठाणे लोकसभा मतदार संघात ६ विधानसभा मतदार संघापैकी एका विधानसभा क्षेत्रात जर १ लाख २५ हजार मतदार ओळख न पटणारे किंवा स्थलांतर झालेले असतील तर ५ विधानसभा क्षेत्रात किती असू शकतील. त्यामुळे सदरचा मतदार यादीतील घोळ अत्यंत संशयास्पद असल्याचे खा. राजन विचारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सदर पत्राद्वारे कळविले आहे. सदर नावे मतदार यादीमध्ये ठेवण्यासाठी काही राजकीय शक्ती क्रियाशील असल्याचा संशय सुध्दा खासदार विचारे यांनी या पत्रामध्ये व्यक्त केला आहे. त्यामुळे मतदार याद्यांमध्ये ओळख न पटणारे जेवढे मतदार आहेत त्यांची शहानिशा अत्यंत पारदर्शक पद्धतीने दुबार तपासणी करावी. जेणेकरुन मतदार यादीत नावे ठेवायची की वगळायची याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी खासदार राजन विचारे यांनी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्याकडे केली आहे.

दरम्यान, जिल्हाधिकारी शिनगारे यांनी निवडणूक अधिकारी उर्मिला पाटील यांना कोणताही राजकीय हस्तक्षेप न करता निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणेच निर्णय घ्यावा, असे आदेश दिले आहेत.

एखाद्या मतदाराचे नाव ण्िंध् श्ीप्ीीीेप्ूीी या वेबसाईट वर शोधल्यास ते असले तरी ओळख न पटणाऱ्या यादीत जर ँथ्ध् नी ींंेाहू/झीस्ीहाहूत्ब् एप्ग्िूा्‌/अीूप् या यादीत समाविष्ठ केले असेल तर याची खातरजमा करायची असेल तर मतदारांना त्या विभागाच्या ँथ्ध् यांच्याकडे करावी, असे सांगण्यात आले आहे.

मतदारांना आपले नाव मतदार यादीत आहे की नाही हे शोधण्यासाठी सोपा मार्ग व्हावा याकरिता आधुनिक तंत्रज्ञाचा वापर करावा, अशी मागणीही केली आहे. तसेच निवडणुकीसाठी आवश्यक असणारा इदीस् घ् ँथ्ीं २ फॉर्म इंग्लिश मध्ये न ठेवता तो मराठीमध्येच ठेवण्यात यावा, अशीही मागणी सदर पत्राद्वारे करण्यात आली आहे.

२५ ठाणे लोकसभेची विधानसभा प्रमाणे आकडेवारीः
विधानसभा क्षेत्र ओळख न पटणारे मतदार
१४५ मीरा भाईंदर विधानसभा १५९३५
१४६ ओवळा माजिवडा विधानसभा १०४०००
१४७ कोपरी पाचपाखाडी विधानसभा १३३५०
१४८ ठाणे शहर विधानसभा १२४९६५
१५० ऐरोली विधानसभा ४६३६
१५१ बेलापूर विधानसभा १९७४
ओळख न पटणारे एकूण मतदार २६४८६०. 

 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

आ. मंदाताई म्हात्रे यांच्याकडून ‘सेंट्रल लायब्ररी' प्रकल्पाची पाहणी