न्यायासाठी स्विकारले ‘महाराष्ट्र कर्मचारी युनियन'चे सदस्यत्व

महापालिका कंत्राटी वाहन चालकांचे कंत्राटदाराकडून शोषण

नवी मुंबई :  प्रलंबित समस्या आणि असुविधांना वाचा फोडविताना न्याय मिळविण्यासाठी नवी मुंबई महापालिका प्रशासनातील कंत्राटी वाहन चालकांनी कामगार नेते रविंद्र यांच्या नेतृत्वाखाली इंटक संलग्न असलेल्या ‘महाराष्ट्र कर्मचारी युनियन'चे सदस्यत्व स्विकारले.

महापालिकेतील या कंत्राटी वाहन चालकांना अवघ्या ११ ते १२ हजार रुपये वेतनावर काम करावे लागत आहे. त्यांना ईएसआय विषयी माहिती नाही, ईएसआय सुविधेचा लाभ भेटत नाही. ठेकेदार ईएसआय भरत असल्याचे सांगतात, तर या कंत्राटी वाहनचालकांना सुविधेचा लाभ का भेटत नाही. अनेक कामगारांना त्यांच्या पीएफचा क्रमांक माहिती नाही, तर ज्यांना माहीत आहे त्यांचा पीएफ नियमा प्रमाणे भरला जात नाही. कमी वेतनात या कामगारांचे शोषण करण्यात येत आहे. ठेक्यात बदल करुन वाहन चालकांचे वेतन वाढले पाहिजे,
यासह अन्य समस्यांनी पिडीत असलेल्या महापालिका सेवेतील सदर कंत्राटी वाहन चालकांनी नेरुळ येथे जाऊन ‘महाराष्ट्र कर्मचारी युनियन'चे सदस्यत्व स्विकारले.

यावेळी कामगार नेते रविंद्र सावंत यांनी कामगारांना ‘युनियन'चे सदस्यत्व देताना कामगारांशी चर्चा केली. तसेच लवकरात लवकर प्रशासनाकडे पाठपुरावा करत समस्यांचे निवारण करुन घेण्याचे आश्वासन या कामगारांना दिले. यावेळी ‘महाराष्ट्र कर्मचारी युनियन'चे वाहन चालक विभागाचे अध्यक्ष राजेंद्र सुतार, कंत्राटी कामगार विभाग अध्यक्ष संजय सुतार, वाशी हॉस्पिटल उपाध्यक्ष सुहास म्हात्रे उपस्थित होते.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

‘गोवर्धनी माता मंदिर प्रवेशद्वार'चा शुभारंभ