एफ.जी.नाईक महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन जल्लोषात साजरे

नवी मुंबई : कोपरखैरणे येथील श्रमिक शिक्षण मंडळाचे एफ. जी. नाईक महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागांतर्गत वार्षिक स्नेहसंमेलन ‘आरंभ दि बिगिनींग' या कार्यक्रमाचे आयोजन विष्णुदास भावे नाट्यगृह येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्‌घाटन कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी नवी मुंबईचे प्रथम महापौर व श्रमिक शिक्षण मंडळाचे प्रमुख विश्वस्त डॉ संजीवजी नाईक यांच्या हस्ते झाले.

सदर प्रसंगी माजी सभापती शिक्षण विभाग नवी मुंबई  ई. ए.पाटील, माजी नगरसेविका वैशालीताई नाईक. सौ. भारतीताई पाटील , सौ. सायलीताई शिंदे,, माजी नगरसेवक केशव म्हात्रे, समाजसेवक संदीप म्हात्रे, दाजी सणस, श्रीमती रितू कपूर, जॉन मॅथ्यू, प्रा. दिलीप केंगार, प्रताप कदम, एफ. जी. नाईक महाविद्यालयाचे प्राचार्य प्रताप महाडिक,  समन्वयक  प्रा. डॉ दत्तात्रय घोडके, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. जयश्री दहाट, सदस्य  प्रा. समिधा पाटील, प्रा. स्वाती हेलकर, प्रा. सीमा शिंदे ,प्रा. चिन्मयी  वैद्य, प्रा. प्राजक्ता सावंत  सर्व प्राध्यापक व  शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी-पालक उपस्थित होते.

डॉ. संजीव नाईक यांनी त्यांच्या भाषणातून श्रमिक शिक्षण मंडळाच्या व महाविद्यालयाच्या एकूण प्रगतीबाबत समाधान व्यक्त करत महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास व्हावा व सामाजिक उपक्रमात विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे म्हणून त्यांना प्रोत्साहित केले जाते याबद्दल संस्थेचे व महाविद्यालयाचे कौतुक केले. सदर प्रसंगी माजी सभापती शिक्षण विभाग नवी मुंबई  ई. ए.पाटील यांनी विद्यार्थ्यांना वामनराव पै यांचे विचार तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार असे सांगून विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविकपर भाषणात एफ. जी. नाईक महाविद्यालयाचे प्राचार्य प्रताप महाडिक यांनी कॉलेज स्थापन झाले तेव्हापासूनच्या प्रवास थोडक्यात मांडला. सदर कार्यक्रमात परीक्षक म्हणून राजा नायडू, निकीता नायडू व दीपक शेट्टी यांनी भूमिका बजावली.  विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे सर्व स्पर्धांमध्ये भाग  घेऊन अप्रतिम, सुरेख कलात्मक नृत्याविष्कार सादर केले व विविधतेने नटलेल्या भारतीय संस्कृतीचे अद्‌भुतपूर्ण चित्र व्यासपीठावर साकारले. तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील नृत्य अविष्कार सादर केले. तर काही विद्यार्थ्यांनी आपल्या सुरेल स्वरांमध्ये भक्ती गीते, भावगीते, देशभक्तीपर गीते सादर केली. वेगवेगळ्या प्रकारच्या पक्ष्यांच्या थीमवर विद्यार्थ्यांनी फॅशन शो सादर केला.  सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाच्या प्रा जयश्री दहाट व विद्यार्थी रेश्मा हातकर, मयूर थोरात, साक्षी गायकवाड आणि रोहिणी वाघमारे यांनी केले; तर आभारप्रदर्शन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. जयश्री दहाट यांनी मानल् 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

भूमीगत रस्ता, उड्डाणपुलासाठी भिमशक्ती पुन्हा आक्रमक