भूमीगत रस्ता, उड्डाणपुलासाठी भिमशक्ती पुन्हा आक्रमक

कळंबोली : एनएच-४ रस्त्यावरील रोडपाली फुडलॅन्ड जंक्शन आणि तळोजा रॅपीड ॲक्शन फोर्स जंवशन या ठिकाणी होणारी वाहतूक काेंडीची समस्या निवारण्यासाठी भूमीगत रस्ता तत्काळ उभारण्यात यावा. तसेच रोडपाली फुडलॅन्ड जंक्शन ते खिडुकपाडा असा उड्डाणपुल बांधण्यात यावा, अशी मागणी ‘भिमशक्ती'चे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष सुभाष गायकवाड यांनी ‘महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ'च्या मुख्य अभियंत्यांना पुन्हा एकदा निवेदनातून करण्यात आली आहे.

दरम्यान, मागणी केल्यानुसार दोन्ही ठिकाणी भूमीगत रस्ते आणि उड्डाणपुलाचे काम प्रत्यक्ष सुरु न झाल्यास येत्या २४ मार्च २०२५ रोजी रोडपाली फुडलॅन्ड जंक्शन येथे प्रवासी, महिला, शाळकरी विद्यार्थी तसेच तळोजा एमआयडीसी मधील कामगार वर्ग, ग्रामस्थ आणि आंबेडकरी समाजबांधव रास्ता-रोको आंदोलन करतील. या आंदोलनाची जबाबदारी सर्वस्वी ‘एमएसआरडीसी'ची असेल, असा इशाराही ‘भिमशक्ती'तर्फे निवेदनातून देण्यात आला आहे.

एनएच-४ रस्त्यावरील रोडपाली फुडलॅन्ड जंक्शन आणि तळोजा रॅपीड ॲक्शन फोर्स जंक्शन या ठिकाणी होणारी वाहतूक काेंडीची समस्या निवारण्यासाठी भूमीगत रस्ता तत्काळ उभारण्यात यावा. तसेच रोडपाली फुडलॅन्ड जंक्शन ते खिडुकपाडा असा उड्डाणपुल बांधण्यात यावा, अशी मागणी ‘भिमशक्ती'च्या वतीने अगोदरच करण्यात येऊन त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. या मागणीच्या अनुषंगाने ‘भिमशवती'ने २१ डिसेंबर २०२३ रोजी रोडपाली फुडलॅन्ड जंक्शन येथे रास्ता-रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यावेळी ‘एमएसअअरडीसी'ने लेखी पत्र देऊन सदरचे काम करणार असल्याचे सांगितले होते.

वास्तविक पाहता ‘भिमशक्ती'चे आंदोलन दडपण्यासाठी ‘एमएसआरडीसी'च्या वतीने जवळपास २४ कोटी २६ लाख रुपये खर्चाचे रोडपाली फुडलॅन्ड जंवशन ते खिडुकपाडा उड्डाणपुल बांधण्याचे अंदाजपत्रकही तयार केले. पण, प्रत्यक्षात संबंधित विभागाची मंजुरी न घेतल्याने आतापर्यंत रोडपाली फुडलॅन्ड जंवशन उड्डाणपुल आणि तळोजा जंक्शन येथे भुयारी मार्ग तसेच नावडे ते खिडुकपाडा उड्डाणपुल उभारण्यात आलेला नाही. परिणामी, प्रशासनाच्या या निष्काळजीपणामुळे आणि चुकीच्या धेारणामुळे याठिकाणी प्रवाशांचे नाहक बळी गेले आहेत. त्यामुळे चर्चेऐवजी अंतिम निर्णय म्हणून येत्या २४ मार्च २०२५ पर्यंत दोन्ही ठिकाणच्या भूमीगत रस्ते आणि उड्डाणपुलाचे काम प्रत्यक्षात सुरु न झाल्यास २४ मार्च २०२५ रोजी रोडपाली जंक्शन येथे रास्ता-रोको आंदोलन करण्याचा इशारा ‘भिमशक्ती'च्या वतीने उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष सुभाष गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने ‘एमएसआरडीसी'ला दिला आहे.

‘भिमशक्ती'च्या विवेदनामध्ये सुभाष गायकवाड यांच्यासह शरद गायकवाड, पंकज गायकवाड, गोपिनाथ गायकवाड, विजय गायकवाड, विलास गायकवाड, सुरेंद्र जाधव, विलास जाधव, जाधव, आदिंच्या सह्या आहेत. दरम्यान, सदर निवेदन ‘एमएसआरडीसी'च्या कार्यकारी अभियंता शैलजा पाटील यांनी स्वीकारले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे संचालक व भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे अध्यक्ष यांनी घेतला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सज्जतेचा आढावा;