महिला बचत गटांमार्फत अभय योजना जनजागृती

उल्हासनगर: उल्हासनगर महापालिका आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी दिलेल्या निर्देशानुसार महापालिका अंतर्गत अंतिम मालमत्ता कर अभय योजना २०२४-२५ लागू करण्यात आली आहे.

सदर अभय योजनेच्या अनुषंगाने अतिरिक्त आयुक्त किशोर गवस, उपायुक्त विशाखा मोटघरे, सहा. आयुक्त अजय साबळे याच्या मार्गदर्शनखाली उल्हासनगर महापालिका मुख्यालय मध्ये महिला बचत गटांची जनजागृती बैठक आयोजित करण्यात आली होती.
महिला बचत गटांमार्फत सर्व नागरिकांना अंतिम अभय योजनेचा लाभ घ्ोण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे. या जनजागृती दरम्यान महापालिकेच्या कर निर्धारक-संकलक निलम कदम यांच्यासह कर निरीक्षक, वसुली लिपीक आणि इतर अधिकारी उपस्थित होते. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नेरुळ जिमखान्याकडून स्त्री मुक्ती संघटनेला बेलर मशिन भेट