२४.३८ लाख वीज ग्राहकांकडून ‘ऑनलाईन पेमेंट'
कल्याणः ‘महावितरण'च्या कल्याण आणि भांडुप परिमंडलात २० फेब्रुवारीपर्यंत २४ लाख ३८ हजार लघुदाब ग्राहकांनी त्यांचे वीजबिल ऑनलाईन भरले आहे. तत्पूर्वीच्या जानेवारी महिन्यात ३८ लाख ४८ हजार ग्राहकांनी वीजबिल भरण्यासाठी डिजीटल माध्यमांचा वापर केला होता. त्यामुळे या ग्राहकांचे बिल भरणा केंद्रासमोर रांगेत उभे राहण्याचे कष्ट आणि वेळ वाचली. शिवाय बिलात पाव (१/४) टक्का सवलतही मिळाली. दरम्यान, जानेवारी ते मे २०२५ या काळात सलग ३ अथवा अधिक वीजबिले ऑनलाईन भरणाऱ्या ग्राहकांना ‘लकी ड्रॉ'द्वारे स्मार्टफोन, स्मार्टवॉच अशी आकर्षक बक्षिसे जिंकण्याची नामी संधी आहे. सर्व ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन ‘महावितरण'ने केले आहे.
कल्याण परिमंडलात जानेवारी महिन्यात २० लाख ९८८ लघुदाब ग्राहकांनी ४५६ कोटी २२ लाख रुपयांची वीजबिले ऑनलाईन भरली. तर २० फेब्रुवारीपर्यंत १३ लाख २२ हजार ६०६ ग्राहकांनी २८० कोटी ३० लाख रुपयांचे वीजबिल ऑनलाईन भरले आहे. भांडुप परिमंडलात जानेवारी महिन्यात १८ लाख ४७ हजार १५१ लघुदाब ग्राहकांनी ५५३ कोटी ४१ लाख रुपयांची वीजबिले ऑनलाईन भरली. तर २० फेब्रुवारीपर्यंत ११ लाख १४ हजार ९९० ग्राहकांनी त्यांच्या ३२९ कोटी ८२ लाख रुपयांच्या वीजबिलाचा ऑनलाईन भरणा केला आहे.
‘महावितरण'च्या वतीने वीजग्राहकांना ैैै.स्ीप्ी्ग्ेम्दस्.ग्ह या वेबसाईटवर तसेच ‘महावितरण'च्या मोबाईल ॲपद्वारे केव्हाही आणि कुठूनही ऑनलाईन पध्दतीने कितीही रकमेचे वीजबिल ऑनलाईन भरण्याची सोय उपलब्ध आहे. ग्राहकांना क्रेडीट, डेबीट कार्ड, नेटबँकींग, यूपीआय, आद इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी त्यांचे वीजबिल भरता येते. तसेच भारत बिल पेमेंट सिस्टीमद्वारेही वीजबिल भरता येते.