सायन-पनवेल मार्गावरील पादचारी पुलाला डंपर धडकल्याने झाला धोकादायक
नवी मुंबई : सायन-पनवेल मार्गावरील सानपाडा येथील पादचारी पुलाला भरधाव डंपर धडकून सदर डंपर पादचारी पुलाला अडकल्याची घटना गत आठवडÎत पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास घडली होती. या अपघातात कोणतीही जीवीत हानी झाली नसली तरी, या अपघातामुळे पादचारी पुलाचे मोठÎ प्रमाणात नुकसान झाले आहे, तसेच हा पुल आता पादचाऱ्यांसाठी धोकादायक झाला आहे. त्यामुळे या पादचारी पुलाची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
गत 8 फेब्रुवारी रोजी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास वाशीकडुन बेलापूरच्या दिशेने जाणारा भरधाव डंपर सायन पनवेल मार्गावरील सानपाडा येथील पादचारी पुलाला धडकला होता. त्यानंतर त्याच्या पाठीमागील भाग सदर पादचारी पुलाच्या मधोमध अडकला होता. सुदैवाने या अपघातात डंपर चालक किंवा इतर कुणीही जखमी झाले नव्हते. त्यावेळी तुर्भे वाहतुक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तात्काळ सदर डंपर बाजुला काढला होता. मात्र या अपघातामुळे सदर पादचारी पुलाचे मोठÎ प्रमाणात नुकसान झाल्याचे तसेच सदर पुल पादचाऱयांसाठी धोकादायक झाल्याचे एका जागरूक नागरीकाने निदर्शनास आणून दिले आहे. तसेच या पादचारी पुलाची तातडीने दुरुस्ती करण्याबाबत सुचित केले आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने काही वर्षापुर्वी ठाणे-बेलापुर मार्गावरुन रस्ता ओलांडून जाणाऱया नागरीकांसाठी सानपाडा येथे पादचारी पूल उभारला आहे. नुकताच या पादचारी पुलाचा सायन-पनवेल मार्गावर विस्तार करण्यात आला आहे. हा पुल नियमाप्रमाणे उंचीवर असतानाही त्याला गत 8 फेब्रुवारी रोजी डंपर धडकल्यामुळे या पादचारी पुलाचे मोठÎ प्रमाणात नुकसान होऊन तो धोकादायक झाल्याचा व्हिडीओ व फोटो एका जागरुक नागरीकाने राज्याचे मुख्यमंत्री व नवी मुंबई महापालिकेला एक्सद्वारे ट्वीट करुन शेअर केले आहेत.
पोलीस निरीक्षक सतीश जाधव (तुर्भे वाहतुक शाखा)
सानपाडा येथील पादचारी पुलाला डंपर धडकल्यामुळे तसेच सदर डंपर त्याच ठिकाणी अडकून पडल्याची घटना गत 8 फेब्रुवारी रोजी घडली होती. या अपघातामुळे सानपाडा येथील सदर पादचारी पुलाचे नुकसान झाल्याची शक्यता लक्षात घेऊन सदर पुलाची तपासणी करण्याबाबत, सार्वजनिक बांधकाम विभागाकडे घटनेच्या दुसऱ्या दिवशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे.