स्ट्रक्चरल हृदयरोगाविषयी वेळीच तपासणी गरजेची
नवी मुंबई : हृदयाच्या झडपा व त्याच्या चेम्बर्सना प्रभावित करणाऱ्या आजाराची प्रकरणे वाढत असून तो आजार जन्मजात किंवा विशिष्ट काळात उद्भवू शकतो. ७३ वर्षीय महिलेवर ओपन हार्ट सर्जरी करणे शवय नसल्याने कमीत कमी चिरा देऊन, कमी रवतस्त्राव होईल याची काळजी घेऊन व्हॉल्व प्रक्रिया नवी मुंबईत पहिल्यांदाच करण्यात आली व त्यांना दुसऱ्याच दिवशी घरी पाठवण्यात आले अशी माहिती अपोलो हॉस्पिटल, नवी मुंबईचे सिनियर कन्सल्टंट डॉ. राहुल गुप्ता यांनी दिली. २२ फेब्रुवारी असणाऱ्या हृदयाच्या झडपेच्या आजाराविषयी जागरुकता दिवसाच्या निमित्ताने ते माहिती देत होते. अशा आजारांबद्दल विविध उपचार पध्दती आता उपलब्ध असल्याने त्याबद्दलची जागरुकता होण्यासाठी वेळीच तपासणी गरजेची असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
नवी मुंबईतीलच ५२ वर्षीय श्वास घेण्याचा त्रास होता. सहा महिने उपचार घेऊनही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. त्यांच्यावर पारंपारिक मिट्रल व्हॅाल्व्ह रिप्लेसमेण्ट करण्यात धोका असल्याने ओपन हार्ट सर्जरी ऐवजी मिट्राविलप प्रक्रिया केली गेली व २४ तासांच्या आत त्यांना घरी पाठवण्यात आले. त्या महिलेचा गंभीर एम आर पूर्णपणे बरा झाला असून संपूर्ण नवी मुंबई, ठाणे व रायगड जिल्ह्यातील मिट्राविलपची अशी पहिलीच केस असल्याचे सदर प्रसंगी सिनियर कन्सल्टंट इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजी डॉ. संजीव कुमार कालकेकर यांनी सांगितले. यावेळी डॉ. ब्रजेश कुवर, डॉ. महेश घोगरे, डॉ. भूषण चव्हाण, डॉ. अरुणेश पुनेथा, डॉ. किरण शिंगोटे हेही उपस्थित होते