नवी मुंबई शहरातील ५०० ऑटोरिक्षांचे आतापर्यंत मीटर कॅलिब्रेशन

वाशी : एमएमआरडीए क्षेत्रातील सर्व शहरांमध्ये १ फेब्रुवारी २०२५ पासून टॅक्सी आणि ऑटोरिक्षा प्रवासासाठी राज्य परिवहन आयुक्त कार्यालयाकडून नवीन मीटर दर लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार पहिल्या टप्याच्या ऑटोरिक्षा प्रवासासाठी २३ ऐवजी आत्ता २६ रुपये ग्राहकांना मोजावे लागत असून, १५ फेब्रुवारी २०२५ पासून रिक्षांचे मीटर कॅलिब्रेशन करण्याची सुरुवात करण्यात आली आहे . नवी मुंबई शहरातील जवळपास ५०० रिक्षांचे आतापर्यंत मीटर कॅलिब्रेशन करण्यात आलेले आहे .

नवी मुंबई शहरात ३७ हजारांपेक्षा अधिक रिक्षा आहेत.  नवी मुंबई मध्ये मीटर भाडे आणि शेअरिंग रिक्षा चालवल्या जातात. रिक्षामधून सीटवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांप्रमाणे मीटरने रिक्षा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या देखील मोठी आहे. त्यामुळे आता मीटरनुसार रिक्षा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता २३ ऐवजी २६ रुपये द्यावे लागत आहेत. यासाठी ऑटोरिक्षा मीटरचे रिडींग बदलण्याचे काम १५ फेब्रुवारी पासून सुरु करण्यात आले आहे. मात्र, अद्याप नवी मुंबई शहरातील बहुतांश ऑटोरिक्षा चालकांकडून मीटर कॅलिब्रेशन करुन  घेण्यात आलेले नाही.  

नवी मुंबई शहरातील जवळपास ५०० ऑटोरिक्षांचे आतापर्यंत मीटर कॅलिब्रेशन करण्यात आले आहे. कंपनीद्वारे सॉपटवेअर उपडेट करण्यात आल्यात्यांनतर ऑटोरिक्षा मीटर कॅलिब्रेशन सुरु करण्यात आले आहे. - गजानन गावंडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी - नवी मुंबई. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

१२ कि.मी. समुद्र पोहून शिवरायांना मानाचा मुजरा