आकाशात ध्वज फडकवत शिवाजी महाराजांना साहसी मानवंदना
कल्याण : आकाशात ध्वज फडकवत आंतरराष्ट्रीय स्तरावर छत्रपती शिवाजी महाराजांना साहसी मानवंदना देण्यात आली. कल्याण मधील कोळीवली गावातील कुस्तीपटु कै. बळीराम कारभारी यांचे सुपुत्र अजित कारभारी यांनी ब्रिगेडियर सौरभ सिंह शेखावत (निवृत्त) यांच्या प्रोत्साहनाने रशिया मधील एरोग्लॅड कोलम्ना येथे ३६ गुण् तापमानामध्ये एल-४१० या हवाई जहाजातून ५१०० मीटर (१६,७३२ फुट) उंच आकाशात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचा ध्वज फडकवत, छत्रपती शिवाजी महाराजांना साहसी मानवंदना दिले. असा साहसी प्रकार करणारे ते पहिले भारतीयन ठरले आहेत.
कर्नल कोस्त्या क्रिवोशिव (२७००० जंप मास्टर- रशियन आर्मी स्कायडाइव्ह मुख्य प्रशिक्षक -आर्मी बेस) आणि युनाइटेड स्टेट पैराशूट असोसिएशनचे (अमेरिका) स्काईडाइविंग प्रशिक्षक राहुल देसाई (डकरे) यांच्या मार्गदर्शनाखाली अजित कारभारी यांनी साहसी कामगिरी यशस्वीरीत्या पूर्ण केली. त्यांच्या या कामगिरी बद्दल सर्वच स्तरांतून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.