ठाणे शहर सुशोभिकरण मोहिमेअंतर्गत १६ किमी पट्टा करणार सुशोभित

ठाणे  : ठाणे महानगरपालिका आणि ठाणे वृक्ष प्राधिकरण यांच्यासोबत सहयोगाने ऑबेरॉय रिॲल्टीने ठाणे शहर सुशोभिकरण मोहिमेच्या लाँचची घोषणा केली. ठाणे महानगरपालिकेद्वारे आयोजित करण्यात येणारा हा वार्षिक महोत्सव १४ ते १६ फेब्रुवारीपर्यंत रेमण्ड ग्राऊण्ड्‌स येथे आयोजित करण्यात आला आहे आणि अभ्यागतांसाठी खुला आहे. या उपक्रमाचा भाग म्हणून ऑबेरॉय रिॲल्टी ठाणे शहरातील १६ किलोमीटरच्या पट्ट्याचे सुशोभिकरण करणार आहे, जेथे रस्त्यांच्या मध्यभागी नयनरम्य ग्रीन कॉरिडर्स तयार करण्यात येतील.

या परिवर्तनात्मक सीएसआर उपक्रमाचा शाश्वत शहरी विकासासाठी ठाणे शहरामधील हरित आच्छादन वाढवण्याचा मनसुबा आहे. हा उपक्रम शहराच्या स्मार्ट सिटी दृष्टिकोनाशी संलग्न आहे, जो पर्यावरणीय व पायाभूत सुविधा सुधारणांना गती देण्यासाठी शहराच्या लँडस्केपला धोरणात्मकरित्या नव्या उंचीवर घेऊन जात आहे. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

प्रत्येक विद्यार्थ्याने एक झाड लावून त्याची काळजी घ्यावी -उपमुख्यमंत्री शिंदे