माळरान ते हिरवाई; निर्जीव वन जमीन पुनर्जीवित

पनवेल : पडीक असलेल्या निर्जीव वनजमीनीला दीपक फर्टिलायझर्स कंपनी तर्फे हरित करत समृध्द करण्यात आल्याने म्हाळुंगी येथील वनजमीन माळरान ते हिरवाई या प्रवासाने पुनर्जीवित झाली आहे.

तळोजा येथील दीपक फर्टिलायझर्स प्रकल्पापासून अवघ्या ५ किलोमीटर अंतरावर असलेली सदर वन जमीन निर्जीव अवस्थेत होती. त्यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) आणि पर्यावरण, वन, हवामान बदल मंत्रालयाच्या सूचनेनुसार दीपक फर्टिलायझर्स कंपनीने या १७.०६ एकर जागेत पुन्हा वृक्षांना जीवदान देण्याचे आव्हान स्वीकारले. त्या अनुषंगाने गेल्या तीन वर्षांच्या अथक प्रयत्नांमुळे एकेकाळी निर्जीव झालेल्या वनक्षेत्राचे रुपांतर हरित परिसंस्थेत झाले आहे. एकेकाळी उजाड आणि ओसाड असलेली सदर वन जमीन आता जिवंत अधिवास, वनस्पती आणि प्राण्यांचे आश्रयस्थान म्हणून उभा राहिला आहे.

‘दीपक फर्टिलायझर्स कंपनी'चे वन विकास प्रकल्प पर्यावरण संवर्धन आणि सामुदायिक कल्याणासाठी कंपनीच्या अढळ बांधिलकीचे प्रतिबिंब आहेत. हवामान बदलाचा सामना करण्यासाठी, जैवविविधता सुधारण्यासाठी आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी शाश्वत भविष्य घडविण्यासाठी वन विकास उपक्रम महत्त्वाचे आहेत. दीपक फर्टिलायझर्स कंपनीने म्हाळुंगी भागात एकूण २ कोटी २० लाख रुपयांची गुंतवणूक करुन विविध प्रकारची औषधी, फळ झाडे आणि देशी प्रजातींसह एकूण१३ हजार ४२० झाडे लावली आहेत, असे ‘दीपक फर्टिलायझर्स'चे अध्यक्ष (मॅन्युफॅक्चरिंग) मुकुल अग्रवाल यांनी सांगितले.

कल्याण वनपरिक्षेत्रांतर्गत पिसावली गावाजवळील ५० एकर जागेत धावडी येथे दीपक फर्टिलायझर्स कंपनीचा पहिला वन विकास उपक्रम सात वर्षांत राबविण्यात आला. १ कोटी ८२ लाख रुपये गुंतवणुकीच्या या प्रकल्पात २२ हजार २०० वृक्षांची यशस्वी लागवड करण्यात आली, अशी माहिती  मुकुल अग्रवाल यांनी दिली.

दीपक फर्टिलायझर्स कंपनी द्वारे राबविण्यात येणारे वन विकास उपक्रम नीती आयोगाने नमूद केल्याप्रमाणे ३३ टक्के वन आणि वृक्षाच्छादन साध्य करण्याच्या भारताच्या मोठ्या उद्दिष्टाशी सुसंगत आहेत. दीपक फर्टिलायझर्स भारताच्या पर्यावरणीय पुनरुज्जीवन आणि शाश्वततेच्या उद्दिष्टांमध्ये योगदान देण्याच्या ध्येयावर ठाम असून जबाबदार कॉर्पोरेट नागरिकत्वासाठी एक बेंचमार्क स्थापित करते. - मुकुल अग्रवाल, अध्यक्ष - दीपक फर्टिलायझर्स कंपनी, तळोजा. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

वालरेक मॉड्युलर सिस्टम कंपनीवर जप्तीची कारवाई