कोपरखैरणे मधील अनधिकृत बांधकामे निष्कासित

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका अतिक्रमण विभाग तर्फे नोटीस देऊनही संबधितांनी नोटिशीची दखल न  घेतल्यामुळे नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार अतिरिक्त आयुक्त (२) डॉ. राहुल गेठे आणि उप आयुक्त (अतिक्रमण) भागवत डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका अतिक्रमण विभाग मार्फत ११ फेब्रुवारी रोजी कोपरखैरणे विभागातील अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्याची कारवाई करण्यात आली.      

नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील कोपरखैरणे विभाग अंतर्गत कोपरखैरणे सेवटर-१५ मधील सत्यजित तुकाराम धुमाळ/ गणेश आर शिंदे- सौ. रंजना गणेश शिंदे यांच्या एस.एस.टाईप, रुम नंबर-१ या बांधकामास महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन आणि नगररचना अधिनियम, १९६६ मधील कलम ५४ अन्वये नोटीस बजावण्यात आली होती. सदर बांधकामावर महापालिका अतिक्रमण विभाग मार्फत निष्कासनाची कार्यवाही करण्यात आली.

महापालिका तर्फे कोपरखैरणे सेक्टर-१२ डी, रामनगर, बोनकोडे येथील घर नंबर-११२३ या शालिक हल्ल्या नाईक यांच्या बांधकामास महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन आणि नगररचना अधिनियम, १९६६ मधील कलम ५४ अन्वये नोटीस बजावण्यात आली होती. सदर बांधकामाचे तिसऱ्या मजल्याचे बांधकाम अंशतः तोडण्यात आले. याशिवाय कोपरखैरणे सेक्टर -१८ मधील रुम नंबर-४५ समोरील दिव्यांग स्टॉल मागील बाजुच्या ओटल्याचे बांधकाम निष्कासित करण्यात आले.

सदर अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई करताना महापालिका कोपरखैरणे विभाग सहाय्यक आयुक्त वसंत मुंडावरे, कनिष्ठ अभियंता चंद्रकांत धोत्रे आणि इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. बांधकाम निष्कासन कारवाईसाठी ९ मजूर, २ इलेक्ट्रॉनिक हॅमर, १ गॅस कटर, १ पिकअप व्हॅन यांचा वापर करण्यात आला.

दरम्यान, महापालिका अतिक्रमण विभाग मार्फत यापुढे देखील अतिक्रमण विरोधी कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार असून, अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात येणार आहेत, असे महापालिका अतिरिक्त आयुक्त (२) डॉ. राहुल गेठे यांनी सांगितले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

वाळलेल्या गवतामुळे पारसिक हिलवर आगींच्या घटनांमध्ये वाढ