सहकार भारती मार्फत नेरूळ येथे कायदेशीर मार्गदर्शन सत्राचे आयोजन
नवी मुंबई : सहकार भारती नवी मुंबईच्या सौजन्याने मेरिडियन सहकारी गृहनिर्माण संस्था, नेरुळ सेक्टर ६ येथे कायदेशीर वारस दाखला, विल व प्रोबेत मार्गदर्शन सत्राचे आयोजन सहकार भारती मार्फत करण्यात आले होते.
गृहनिर्माण संस्थांमध्ये सर्वांना भेडसावणाऱ्या प्रॉबेट, वील, हेयरशिप या समस्यांचे मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी कायदेशीर तरतुदी तसेच त्या करत असताना घ्यावी लागणारी काळजी त्यातील धोके आणि फायदे या सर्वांची तपशीलवार माहिती मार्गदर्शकांनी गृहनिर्माण संस्थेतील सभासदांना दिली. गृहनिर्माण संस्थांमधील सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यात आली. याप्रसंगी सहकार भारतीचे अध्यक्ष प्रमोद जोशी, महामंत्री संतोष मिसाळ, अधिवक्ता प्रकोष्टप्रमुख अँड सौ.साक्षी वेखंडे, मार्गदर्शक अँड सुशांत जोशी, अँड सौ अपर्णा नाडगोडी ( कुलकर्णी) अँड पांडुरंग नाईक अँड प्रितेश जोशी, उदय कुमार तांदळे, सुनील सावंत, डावरे उपस्थित होते. सर्व सभासदांच्या शंकांचे समाधान केल्यानंतर गृहनिर्माण संस्थांचे श्री. अग्रवाल यांनी आभार प्रदर्शन केले.