एक्सप्रेस मार्गावरील पनवेल एक्झीट मार्ग पुढील ६ महिन्यासाठी बंद
नवी मुंबई : ‘महाराष्ट्र राज्य पायाभुत विकास महामंडळ'कडून कळंबोली जक्शनची सुधारणा करण्यात येणार आहे. या कामामुळे कळंबोली सर्कल येथे वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मुंबई वाहिनीवरील पनवेल एक्झीट ११ फेब्रुवारी पासून पुढील ६ महिने बंद ठेवण्यात येणार आहे. त्यानुसार मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरुन पनवेल एक्झीट येथून कळंबोली सर्कलवरुन पनवेल, मुंब्रा तसेच जेएनपीटीकडे कडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या (हलकी, जड-अवजड वाहने) वाहनांना पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत.
‘महाराष्ट्र राज्य पायाभुत विकास महामंडळ'कडून कळंबोली जंक्शनची सुधारणा करण्यात येणार आहे. त्यानुसार कळंबोली सर्कल येथे नव्याने उड्डाणपुल आणि भुयारी मार्गाचे काम हाती घेण्यात येणार आहे. सदर कामादरम्यान वाहतूक कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेऊन नवी मुंबई वाहतूक विभागाने यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मुंबई वाहिनीवर कि.मी. १.२०० पनवेल एक्झीट मार्ग ११ फेब्रुवारी पासून पुढील ६ महिने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
याबाबतची अधिसूचना नवी मुंबई वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांनी जाहीर केली आहे. त्यानुसार मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरुन पनवेल एक्झीट येथून कळंबोली सर्कलवरुन पनवेल, मुंब्रा तसेच जेएनपीटीकडे कडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या (हलकी, जड-अवजड वाहने) वाहनांना पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला आहे.
वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग...
यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरुन पनवेल, गोवा, जेएनपीटीकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना कोनफाटा (कि.मी. ९.६००) येथे डावीकडे वळण घेवून एनएच-४८ मार्गावरुन पळस्पे सर्कल येथून इच्छितस्थळी जाता येणार आहे. तसेच मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरुन (पनेवल एक्झीट) येथून तळोजा, कल्याण-शिळफाटा कडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना सरळ पनवेल-सायन महामार्गावरुन पुरूषार्थ पेट्रोलपंप उड्डाणपुलाखालून उजवीकडे घेवून रोडपाली येथून एनएच-४८ महामार्गावरून इच्छितस्थळी जाण्यासाठी पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला आहे.
‘महाराष्ट्र राज्य पायाभुत सुविधा विकास महामंडळ'तर्फे कलंबोली जंक्शनच्या सुधारणा करण्याचे काम पूर्ण होईपर्यंत सदरची वाहतूक अधिसुचना लागू राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी या कालावधीत वाहतुकीसाठी पर्यायी मार्गाचा वापर करावा.
-तिरुपती काकडे, पोलीस उपायुवत-नवी मुंबई वाहतूक विभाग.