अक्षरसुलेखनकार विलास समेळ यांचा सत्कार
नवी मुंबई : कोपरखैरणे येथील शेतकरी समाज संघटना सभागृहात ९ फेब्रूवारी रोजी पार पडलेल्या एका विशेष कार्यक्रमात सुयश सामाजिक आणि शैक्षणिक संस्थेच्या वतीने नवी मुंबईतील ज्येष्ठ सुलेखनकार आणि स्तंभलेखक विलास समेळ यांना हास्य अभिनेता आणि मिमिक्री कलावंत जॉनी रावत यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले.
श्री.समेळ गेली अनेक वर्षे सुंदर हस्ताक्षरांसाठी सुपरिचित असून त्यांना विविध शाळा-महाविद्यालये येथील विद्यार्थीवर्गांचे हस्ताक्षर सुंदर असावे यासाठी अनेक कार्यशाळा घेतल्या आहेत. तसेच त्यांनी आपल्या सुलेखनकलेची विविध प्रदर्शनेही भरवली आहेत. विविध सामाजिक-सेवाभावी संस्था, मंडळे यांनी वेळोवेळी समेळ यांच्या सुलेखनकलेचा गौरव केला आहे.