शेलघर मध्ये भव्यदिव्य ‘साई मंदिर'ची उभारणी!

उलवे : साधारण सात ते आठ कोटी रुपये खर्च करुन शेलघर मध्ये भव्यदिव्य साई मंदिर उभारले जाणार असून, या साई मंदिराचे भूमिपूजन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते ६ फेब्रुवारी रोजी करण्यात आले.

याप्रसंगी आमदार महेश बालदी, ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, ‘साई संस्थान सेवाभावी संस्था'चे अध्यक्ष अरुणशेठ भगत, कार्याध्यक्ष तथा आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्र घरत, रतनशेठ भगत, गुलाबशेठ घरत, रघुनाथशेठ घरत, प्रल्हाद केणी, रमेश घरत, श्रीधर भगत, अमृत भगत, अनिल घरत, अजय भगत, सचिन घरत, मिलिंद पाडगावकर, मार्तंड नाखवा, अखलाक शिलोत्री, वैभव पाटील, किरीट पाटील, रायगड जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा श्रध्दा ठाकूर यांच्यासह शेलघर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दिवंगत जनार्दन आत्माराम भगत यांचे नाव मोठे व्हावे, लोकांच्या कायम लक्षात राहावे, याकरिता त्यांच्या नावाने शिक्षण संस्था सुरु केली. शेलघर स्व. जनार्दन भगत साहेबांचे गाव आहे. शेलघर येथे भव्यदिव्य साई मंदिर उभारण्यात येत असल्याचे मला विशेष कौतुक आहे. या मंदिर उभारणीत काहीही कमी पडणार नाही, अशी ग्वाही माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी यावेळी दिली.

माजी खासदार रामशेठ ठाकूर शेलघर गावचे जावई आहेत. दिवंगत जनार्दन भगत यांचे जावई असल्याने शेलघर गावासाठी सढळ हाताने मदत करण्याची लोकनेते रामशेठ ठाकूर यांची भूमिका कायम आहे. त्यामुळेच लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शेलघर मध्ये होणाऱ्या भव्यदिव्य साई मंदिरासाठी अडीच कोटींची देणगी जाहीर करुन सासरवाडीतील आपली मान अधिक उंचावली आहे.

शेलघर पंचक्रोशित आजघडीला बंगल्यांचे गाव म्हणून उदयास आले आहे. सुनियोजित, स्वच्छ, सुंदर असलेल्या शेलघर मध्ये भव्यदिव्य साई मंदिर असावे, असा मानस साईभक्त महेंद्र घरत यांनी अरुणशेठ भगत आणि ग्रामस्थांसमोर व्यवत केला. त्याला सर्वांनी मनापासून होकार दिल्याने साई मंदिराचे भूमिपूजन देखील झाले.

कोणत्याही परिस्थितीत शेलघर मध्ये सुंदर आणि आकर्षक साई मंदिराचे बांधकाम लवकरच मार्गी लागण्यासाठी शक्य ते सहकार्य करण्यात येईल, अशी भूमिका मांडून यावेळी महेंद्र घरत यांनी साई  मंदिर उभारणीसाठी ५५ लाख रुपयांची देणगी जाहीर केली.

साई संस्थान सेवाभावी संस्था, शेलघर तर्फे साई मंदिराची उभारणी करण्यात येत आहे. या साई मंदिरासाठी शेलघर ग्रामस्थांतर्फेही मदतीचा ओघ सुरु आहे.

उलवे नोड मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्यासह भव्य स्मारक उभारण्याचे काम लवकरच हाती घेण्यात येणार असून, त्यामुळे उलवे नोड अधिक चांगल्या प्रकारे नावारुपास येईल, असा विश्वास यावेळी महेंद्र घरत यांनी व्यवत केला. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

खारघर, कळंबोली येथील एसटीपी प्लांट पनवेल महापालिकाकडे हस्तांतरण करण्याची मागणी