सहा वर्षीय परिधी घरत हिचा नवा विक्रम

उरण : उरण तालुक्यातील उरण-मोरा रस्त्यावर असलेल्या फणसवाडी येथील सामान्य कुटुंबातील सहा वर्षीय परिधी प्रमोद घरत या चिमुरडीने नवा विक्रम केला आहे. जगविख्यात घारापुरी बंदर ते मुंबई, गेटवे ऑफ इंडिया दरम्यानचे १२ किमी सागरी अंतर परिधी घरत हिने अवघ्या ६ तास ५ मिनिटात पोहून पार केले आहे. परिधी घरत सध्या उरण एज्युकेशन स्कुल मध्ये इयत्ता पहिलीमध्ये शिकत असून, तिला पोहण्याची आवड आहे.

घारापुरी ते मुंबई दरम्यानचे सागरी अंतर पोहून पार केल्याबद्दल आमदार महेश बालदी यांनी परिधी घरत हिचे आणि परिवाराचे कौतुक करुन सत्कार केला. पुढील काळात अजूनही उरण तालुवयाचा नावलौकिक कर, अशी शुभेच्छा देऊन यावेळी आमदार महेश बालदी यांनी परिधी घरत हिचे अभिनंदन केले.

याप्रसंगी उरण तालुका भाजपाध्यक्ष रवी भोईर, माजी उपनगराध्यक्ष जयवीन कोळी, उरण शहर भाजपाध्यक्ष तथा माजी नगरसेवक कौशिक शाह, माजी नगरसेवक नंदू लांबे, माजी नगरसेवक राजेश ठाकूर, हितेश ठाकूर, प्रमोद घरत आदी मान्यवर उपस्थित होते.

खेळण्या बागडण्याच्या वयात मुले जेव्हा साहसी कृत्य करतात तेव्हा त्यांच्या पालकांची छाती नक्कीच अभिमानाने फुगून येत असते. परिधी घरत हिने देखील आपल्या जलतरणातील कसब पणाला लावत पहिल्या प्रयत्नात यश मिळवले आहे. उरण नगरपरिषद जलतरण तलावात अवघ्या एक वर्ष दररोज ४ तास केलेल्या सरावानंतर परिधी घरत हिने घारापुरी बंदर ते गेटवे ऑफ इंडिया दरम्यानचे १२ किमी सागरी अंतर पोहून जाण्याचा विक्रम केला आहे. घारापुरी बंदर येथून पहाटेच्या काळोखामध्ये ४ वाजून ३८ मिनिटांनी परिधी घरत हिने समुद्राच्या लाटांवर झेप घेत विक्रमाला सुरुवात केली. काळोखामध्ये फेसाळणाऱ्या लाटा, जेएनपीटी बंदरमध्ये येणारी मोठी जहाजे, नाकातोंडात जाणारे खारे पाणी, वाटेत डॉल्फीन माशांचा वावर त्यातून सलग सहातास हातपाय हलवत पोहत राहाणे, अशा अनेक अडचणींना सामोरे जात अखेर परिधी घरत हिने घारापुरी बंदर ते गेटवे ऑफ इंडिया दरम्यानचे सागरी अंतर ४ फेब्रुवारी रोजी ६ तास ४ मिनिटात पोहून पूर्ण करुन, सर्वांना सुखद धक्का दिला आहे.

पोहण्याची आवड आणि जिद्दीमुळे परिधी घरत हिने घारापुरी बंदर ते गेटवे ऑफ इंडिया दरम्यानचे सागरी अंतर पोहून पार करण्यात यश मिळवले असून, घरत कुटुंबाला तिचा अभिमान आहे, अशी प्रतिवि्रÀया तिचे वडील प्रमोद घरत यांनी व्यवत केली.

दरम्यान, जलतरण या खेळ प्रकारातून पुढे आणखी मोठ्या विक्रमांना गावसणी घालायची आहे, असा मानस परिधी घरत हिने व्यवत केला.

अवघ्या सहाव्या वर्षी पोहण्याचा विक्रम करून, आपली ओळख निर्माण करणाऱ्या परिधी घरत हिचे सर्वांकडून कौतुक होत आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

शेलघर मध्ये भव्यदिव्य ‘साई मंदिर'ची उभारणी!