सानपाडा येथे हळदीकुंकू समारंभ उत्साहात संपन्न
सानपाडा : शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष महिला आघाडी, सानपाडा यांच्या वतीने सेक्टर-८ मधील गणेश मंदिराजवळील हुतात्मा बाबू गेनू सैद मैदानावर सौ. रश्मी ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हळदीकुंकू समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा विशेष सत्कार करण्यात आला. मेळाव्यात लकी ड्रॉ विजेत्या महिलांना ३० पैठणी आणि २ सोन्याच्या नथ देण्यात आल्या. सर्व महिलांचा वाण देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. या सोहळ्यासाठी हुतात्मा बाबू गेनू मैदान महिलांनी खच्चून भरले होते.
याप्रसंगी मुंबईच्या माजी महापौर विशाखा राऊत, शिवसेना उपनेत्या ज्योती ठाकरे, नवी मुंबई जिल्हाप्रमुख वि्ील मोरे, प्रवीण म्हात्रे, विधानसभा प्रमुख एम. के. मढवी, संपर्क प्रमुख रंजना नेवाळकर, जिल्हा संघटक रंजना शिंत्रे, समारंभाचे आयोजक माजी नगरसेवक तथा महानगर प्रमुख सोमनाथ वास्कर, आयोजिका माजी नगरसेविका तथा शहर संघटक सौ. कोमल वास्कर, उपशहर प्रमुख सुनील गव्हाणे, विभाग प्रमुख बाबाजी इंदोरे, उपविभाग प्रमुख तानाजी चव्हाण, महिला आघाडी उपविभाग संघटक साधना इंदोरे, आदि मान्यवर उपस्थित होते.
सदरकार्यक्रमाचे निवेदन विभागप्रमुख अजय पवार आणि सौ. तेजस्विनी मुंडये यांनी केले.