राष्ट्रीय पातळीवरील प्रदर्शनासाठी कु. शुभदा यादवची निवड
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका संचलित मान्यवर काशीरामजी हिंदी विद्यालय येथील इयत्ता ७ वीची विद्यार्थिनी शुभदा जितेंद्र यादव हिची बंगळुरु येथील विश्वेश्वरय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे होणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील प्रदर्शनासाठी राज्यातून प्रथम क्रमांकाने निवड झाली आहे. तिला शुभेच्छा देताना माजी महापौर सुधाकर सोनवणे, सौ.रंजनाताई सोनवणे, शाळेचे मुख्याध्यापक जे.पी.सिंग, ज्येष्ठ शिक्षक जितेंद्र सोनी, क्रीडा शिक्षक अमोलकुमार वाघमारे, शुभदाचे वडील जितेंद्र यादव, दीपक दीलपाक, आजी भाग्यमनी यादव इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
शुभदाने मेडिकल बूथ फॉर ब्लाइंड स्पॉट्स एरिया या प्रकल्पाबाबत समस्या निराकरण प्रकल्प सादर केला होता. या प्रकल्पासाठी तिला प्रिया मॅडम, निधी शर्मा, अमीत विश्वकर्मा, बहीण खुशबू यादव यांचे मार्गदर्शन लाभले.