श्रीमूर्ती विसर्जनासाठी २६ कृत्रिम तलाव

नवी मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पर्यावरण संरक्षणासाठी माघी श्रीगणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिस पासून बनविलेल्या श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी नवी मुंबई महापालिका तर्फे २६ कृत्रिम विसर्जन तलावांची निर्मिती करण्यात आली आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने ३० जानेवारी २०२५ रोजी दिलेल्या आदेशानुसार राज्यात प्लास्टर ऑफ पॅरिस पासून बनविलेल्या मूर्तींची विक्री करण्यास बंदी आहे. याशिवाय प्लास्टर ऑफ पॅरिस मूर्तींचे नैसर्गिक तलावामध्ये विसर्जन करण्यासही बंदी आहे.

या अनुषंगाने माघी श्रीगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार, नवी मुंबई महापालिका तर्फे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्रीगणेशमूर्ती विसर्जनासाठी ठिकठिकाणी २६ कृत्रिम विसर्जन तलावांची निर्मिती करण्यात आली आहे. या तलावांवर संबंधित महापालिका विभाग कार्यालयांचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी यांचे निरीक्षण आणि दोन्ही परिमंडळांचे उपआयुक्त यांचे नियंत्रण असणार आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने नागरिकांनी माघी श्रीगणेशोत्सवात प्रतिष्ठापना केलेल्या प्लास्टर ऑफ पॅरिस पासून बनविलेल्या श्रीमूर्तींचे विसर्जन तसेच शाडूच्या श्रीमूर्तींचेही विसर्जन पर्यावरणशील दृष्टीकोन जपत कृत्रिम विसर्जन तलावात करावे, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी केले आहे.

कृत्रिम विसर्जन तलावांची यादी  

दिघा विभाग -४ कृत्रिम तलाव
खोकड तलाव जवळ, गणपतीपाडा पेट्रोल पंपजवळ, मनुभाई मैदान, रावली मिलजवळ

ऐरोली विभाग - ३ कृत्रिम तलाव  
दिवा सेक्टर-९ तलाव जवळ, ऐरोली नाका सेवटर-१ तलाव जवळ, ऐरोली सेवटर-२० खाडी तलाव जवळ

घणसोली विभाग - ४ कृत्रिम तलाव
रबाळे तलाव जवळ, गुणाली तलाव जवळ, खदाण तलाव (राजीव गांधी तलाव) जवळ, छत्रपती शिवाजी महाराज तलाव जवळ

कोपरखैरणे विभाग - ३ कृत्रिम तलाव
कोपरखैरणे सेक्टर-१९  धारण तलाव जवळ, महापे तलाव जवळ,

महापे शाळा मैदान

तुर्भे विभाग - ३ कृत्रिम तलाव
कोपरीगाव तलाव जवळ, तुर्भेगाव तलाव जवळ, खोकड तलाव सानपाडा जवळ

वाशी विभाग - २ कृत्रिम तलाव
वाशी सेक्टर-७ तलाव जवळ, जुहूगाव सेक्टर-१२

नेरुळ विभाग -२ कृत्रिम तलाव
चिंचोली तलाव शिरवणे जुईनगर जवळ, नेरुळ गाव तलाव जवळ

बेलापूर विभाग - ५ कृत्रिम तलाव
आग्रोळी तलाव जवळ, बेलापूर गाव तलाव जवळ, करावे तलाव जवळ, दारावे तलाव जवळ, दिवाळे जेट्टी जवळ 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पंचरत्न मित्र मंडळाने शैक्षणिक साहित्य वाटपातून जपली सामाजिक बांधिलकी