उल्हासनगर महापालिकेच्या ताब्यात लवकरच १०० ई-बसेस

उल्हासनगर : उल्हासनगर महापालिका परिवहन उपक्रमाच्या ई-बस सेवेला चांगलाच प्रतिसाद मिळत असून उल्हासनगर, कल्याण, अंबरनाथ आणि बदलापूर शहरापर्यंत वातानुकूलित बसेस धावत आहेत. या बससेवेला चांगलाच प्रतिसाद मिळत असून गेत्या काही दिवसात १०० ई-बसेस ( इलेक्ट्रिक बस) उपलब्ध होणार आहेत. यामुळे चांगल्या दर्जाची परिवहन सेवा देण्यासाठी उल्हासनगर महापालिका प्रयत्नशील असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

ई-बस चालक आणि वाहकांचे प्रशिक्षण, अपघातांचे प्रमाण कमी करुन दर्जेदार सेवा देण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न.  उल्हासनगर महापालिका परिवहन उपक्रमाने शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्याच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. ई-बस सेवा अधिक सुरक्षित, पर्यावरणपूरक आणि आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य बनविण्याच्या उद्देशाने परिवहन विभागाने कंडक्टर, चालक आणि संबंधित अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला होता.  

अपघातांची संख्या कमी करणे, प्रवाशांना दर्जेदार सेवा देणे आणि महसूल वाढीला चालना देणे, असा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. DHA ई-बस उपक्रमांतर्गत महापालिकेने यापूर्वीच काही ई-बस सुील् केल्या आहेत आणि DHA ई-बस उपक्रमांतर्गत आणखी १०० ई-बसद्वारे शहराच्या बस वाहतूक सेवेत महत्त्वपूर्ण बदल घडवून आणण्याची योजना आहे. या नवीन बसचे व्यवस्थापन आणि सुरक्षित वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी चालक, वाहक आणि अधिकाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले.  प्रशिक्षण सत्रात बस वाहतूक व्यवस्थापनातील जागतिक सर्वोत्तम पध्दतींचा अवलंब करणे, अपघात टाळण्यासाठी अत्याधुनिक उपायांचा अवलंब करणे आणि प्रवाशांच्या सुविधांमध्ये सुधारणा करण्यावर भर देण्यात आला.  

ई-बस सेवा अधिक कार्यक्षम आणि पर्यावरणपूरक बनवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. उल्हासनगर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्या नेतृत्वाखाली प्रशिक्षण सत्राला सुरुवात झाली आहे. याप्रसंगी अतिरिवत आयुवत लेंगरेकर यांच्यासह उपायुक्त अजय साबळे, परिवहन विभागप्रमुख विनोद केणे, आगार व्यवस्थापक दत्तात्रय शिरसाट, परिवहन विभागाच्या अधीक्षक उषा मौले उपस्थित होते. या कार्यक्रमाला कल्याण-डोंबिवली महापालिका, भिवंडी-निजामपूर महापालिका, अंबरनाथ नगरपरिषद आणि कुळगाव-बदलापूर नगरपरिषदचे अधिकारी उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीने प्रशिक्षण सत्र अधिक व्यापक झाले. उत्तम दर्जाची सेवा दिली जाईल. प्रशिक्षणानंतर उल्हासनगर महापालिकेच्या वतीने भविष्यात प्रवाशांना दर्जेदार सेवा देण्याची ग्वाही यावेळी देण्यात आली.

सदर ई-बस प्रकल्पामुळे पर्यावरण संरक्षणाला चालना मिळेल आणि शहराच्या वाहतूक व्यवस्थेत बदल घडतील, अशी अपेक्षा आहे. महापालिका जनसंपर्क अधिकारी छाया डांगळे यांनी सदर उपक्रमाचे महत्त्व विशद केले. प्रशिक्षणामुळे चालक आणि वाहक अधिक जबाबदार होतील. अपघातांचे प्रमाण कमी होईल आणि महापालिकेच्या परिवहन विभागाला आर्थिक लाभ मिळेल, असेही डांगळे यांनी सांगितले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

भाषा माणसांमधील आदर वाढविण्याचे महत्त्वाचे साधन -अच्युत पालव