मॉडर्न स्कुलचे विद्यार्थी कराटे स्पर्धेत चमकले

नवी मुंबईः राज्यस्तरीय कराटे स्पर्धेमध्ये रयत शिक्षण संस्थेच्या वाशी येथील मॉडर्न स्कुलमधील विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे.२८ ते  ३० नोव्हेंबर दरम्यान धुळे येथे आयोजित राज्यस्तरीय कराटे क्रीडा स्पर्धेत मॉडर्न स्कुलच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.

यामध्ये  श्रावणी राजू चिंचोलकर १७ वर्षे वर्षाखालील मुलींच्या ३६ ते ४० किलो वजनी गटात रौप्य पदक, स्वरा महेश कदम हिने १७ वर्षाखालील मुलींच्या ४० ते ४४ किलो वजनी गटात कांस्य पदक तर १७ वर्षाखालील मुलांच्या ७४ ते ७८ किलो वजनी गटात संकल्प शिवाजी पाटील याने कांस्य पदक मिळविले आहे. धुळे येथील जिल्हा क्रीडा संकुलात पार पडलेल्या या स्पर्धेमध्ये राज्यभरातून विद्यार्थी सहभागी झाले होते. विजयी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे प्राचार्या सुमित्रा भोसले यांनी कौतुक केले. यावेळी विद्यालयाच्या पर्यवेक्षिका हना सरेला, मनीषा सकपाळ, क्रीडा शिक्षिका प्राजक्ता, जयसिंग पवार व विद्यार्थी उपस्थित होते.

Read Previous

शिवसेना उरण ने जपली सामाजिक बांधिलकी

Read Next

वसई-विरार महापालिका मॅरेथॉन स्पर्धेत तुटले अनेक विक्रम