‘आंतरराष्ट्रीय पॉवर लिपटींग स्पर्धा'साठी महाराष्ट्रातील ७ जणांची निवड

डोंबिवली : सोनीपत (हरियाणा) येथे नुकत्याच झालेल्या १३ व्या ‘राष्ट्रीय पॉवर लिपटींग स्पर्धा'मधील महाराष्ट्रातील सुवर्ण पदक मिळविलेल्या ७ स्पर्धकांची सोलव्हाकिया-त्रणवा (युरोप) येथे येत्या १० ते १३ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत होणाऱ्या ‘आंतरराष्ट्रीय पॉवर लिपटींग स्पर्धा'साठी भारतीय संघामध्ये निवड झाली आहे.

सलग ३ वर्षे राष्ट्रीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करुन या खेळाडुंनी सुवर्ण पदकाची हॅटट्रिक केली आहे. सदर कामगिरी लक्षात ठेवून ‘राष्ट्रीय पॉवर लिपटींग संघटना'ने हया स्पर्धकांची निवड केली आहे. महाराष्ट्रातून ‘आंतरराष्ट्रीय पॉवर लिपटींग स्पर्धा'साठी केवळ ७ खेळाडूंची निवड झाली. तसेच मास्टर गटार्तील सलग ३ वेळा सुवर्णपदक पटकाविलेले समीर जोगळेकर (डोंबिवली), रामदिन नंदकिशोर (अहमदनगर),  संभाजी अंकलेकर (पनवेल), सलग २ वेळा सुवर्णपदक पटकाविलेले (४) उंडाळे गांवचे ‘रयत जिमखाना'चे प्रमोद पाटील, स्मिता प्रमोद पाटील या खेळाडुंची निवड झाली. तसेच कांदिवली मधील प्रतिभा तावडे आणि सर्वात सब ज्युनिअर गटामध्ये (७) अडसरी येथील इगतपुरी येथील समिक्षा रमेश शिंदे यांची निवड झाली. सदर निवड ‘राष्ट्रीय पॉवर लिपटींग संघटना'चे अध्यक्ष जुगल धवन यांनी केली. ‘फेडरेशन'च्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या खेळाडूंचे अभिनंदन केले. 

Read Previous

शिवसेना उरण ने जपली सामाजिक बांधिलकी