शिक्षक दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पोस्ट कार्ड पाठविले

‘आप'तर्फे ‘वन नेशन-वन एज्युकेशन' संदेशाचे पोस्ट कार्ड तयार

नवी मुंबई  ‘शिक्षक दिन'चे औचित्य साधत ‘टीम आप नवी मुंबई'तर्फे विष्णुदास भावे सभागृह वाशी येथील शिक्षक दिन सोहळ्यादरम्यान महापालिका शिक्षकांचा फुले देऊन सन्मान करण्यात आला. दिल्ली मध्ये अति उत्कृष्ट सरकारी शिक्षण आणि आरोग्य व्यवस्थेचा पाया मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आप पक्षाने रचला आहे. शिक्षण आणि आरोग्याच्या व्यवस्थेची सदर क्रांती संपूर्ण भारतभर पसरविण्याचा निर्धार करणाऱ्या कार्यकर्त्यांची फौज भारतभर उभी राहत असून त्याला नवी मुंबई देखील अपवाद नाही.

‘टीम आप नवी मुंबई'तर्फे सध्याच्या केंद्र सरकारच्या ‘वन नेशन-वन इलेक्शन' या घोषवाक्या ऐवजी ‘वन नेशन-वन एज्युकेशन -वन हेल्थकेयर-फ्री एज्युकेशन-फ्री हेल्थकेयर' असा संदेश देणारे पोस्ट कार्डस्‌ तयार करण्यात आले आहे. सदरचे पोस्ट कार्ड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह इतर संबंधितांना देखील पाठविण्यात आले आहेत. आपल्या देशातील प्रत्येक वयातील मोफत शिक्षण आणि आरोग्य व्यवस्थेचा हक्क ‘संविधान'ने दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर सदर संदेश पाठविण्यात आला आहे, अशी माहिती ‘आप'चे नवी
मुंबई कार्यकारी अध्यक्ष श्यामभाऊ कदम यांनी दिली.

दरम्यान, शिक्षकांच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन ‘टीम आप नवी मुंबई'तर्फे श्यामभाऊ कदम यांच्या मार्गदर्शनाखाली झाला. याप्रसंगी ‘आप'च्या नवी मुंबई उपाध्यक्ष प्रीती शिंदेकर, ऐरोली विधानसभा अध्यक्ष देवराम सुर्यवंशी, उपाध्यक्ष मिलिंद तांबे, सहसचिव नीना जोहरी, महादेव गायकवाड, युवा नेते चिन्मय गोडे, ऐरोली नोड महिला अध्यक्ष आरती सोनावणे, कोपरखैरणे वॉर्ड अध्यक्ष आरती शाह, ऐरोली वॉर्ड अध्यक्ष गायत्री तांबे, आदि उपस्थित होते.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

मतदान नोंदणी अधिकाऱ्यांच्या संभाव्य मतदार केंद्रांना भेटी