रायगड जिल्हा परिषदेचे मा. सदस्य बाजीराव परदेशी यांचे निधन 

माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव परदेशी यांच्या निधनाने उरण पूर्व विभागावर शोककळा

उरण  :राजकीय क्षेत्रात आपल्या नावाची एक वेगळीच ओळख निर्माण करणारा उरण तालुका काँग्रेस पक्षाचा युवा नेता, चिरनेर ग्रामपंचायतीचे मा.सरपंच तथा रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य,पक्ष प्रतोद बाजीराव परदेशी यांचे गुरुवारी ( दि२४) खारघर येथील रुग्णालयात उपचारा दरम्यान निधन झाले आहे. बाजीराव परदेशी यांचे वय ५८ वर्षे होते. त्याच्या निधनानंतर चिरनेर परिसरात शोककळा पसरली आहे.

ऐतिहासिक प्रसिद्ध चिरनेर गावातील दामा परदेशी कुटुंबात जन्मलेले बाजीराव परदेशी हे काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते होते.त्यांनी चिरनेर ग्रामपंचायतीचे सरपंच,रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य तसेच पक्ष प्रतोद म्हणून उरण- चिरनेर परिसरातील सर्वांगीण विकासासाठी योगदान दिले होते.खारघर येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना गुरुवारी ( दि२४) त्यांचे निधन झाले.चिरनेर स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.मा आमदार मनोहर भोईर,काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा कामगार नेते महेंद्र घरत, जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाडगांवकर, उद्योगपती पी.पी.खारपाटील, उद्योगपती अनिल मुंबईकर,तालुकाध्यक्ष विनोद म्हात्रे, तालुकाप्रमुख संतोष ठाकूर,रायगड जिल्हा परिषद मा सदस्य डॉ मनिष पाटील, महेंद्र ठाकूर,वैजनाथ ठाकूर,मा.सभापती भास्कर मोकल,सामाजिक कार्यकर्ते बी.एम.ठाकूर, शेकापचे ज्येष्ठ नेते काशिनाथ पाटील, कैलास म्हात्रे, तसेच विविध पक्षांचे पदाधिकारी,आजी माजी जिल्हा परिषद सदस्य, सरपंच, उपसरपंच यांनी चिरनेर गाव आपल्या होतकरू तरुणाला, कार्यकर्त्याला, सदस्याला मुकला अशा स्वरूपाची श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित होता.

 

 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

उरण विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक मोठ्या उत्साहात संपन्न