वाशी सेक्टर-१० येथील ‘बस स्टॉप'चे लोकार्पण
नवी मुंबई : आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नांतून तसेच आमदार निधीमधून बेलापूर विधानसभा मतदारासंघ मध्ये गेली २० वर्षे विकास कामांची गंगा सुरूच आहे. त्याच अनुषंगाने १२ फेब्रुवारी रोजी आ. मंदाताई म्हात्रे यांच्या आमदार निधी मधून ६ लाख खर्च करून वाशी-कोपरखैरणे रोड वरील वामन हरी पेठे ज्वेलर्स समोर नव्याने बस स्टॉप बांधण्यात आला आहे. या ‘बस स्टॉप'चे लोकार्पण आमदार म्हात्रे यांच्या उपस्थितीत वाशी से-९/१० मधील ‘ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र'चे अध्यक्ष गुणाजी कोकाटे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
बेलापूर मतदारसंघातील जेवढ्या शाळा, महाविद्यालया समोरील बस स्टॉप आणि जीर्ण झालेले बस स्टॉप असतील ते निष्काशित करुन सदर ठिकाणी आमदार निधीमधून उत्तम दर्जाचे बस स्टॉप उभारण्यात येतील, असे आ. मंदाताई म्हात्रे यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, अनेक वर्षापासून सदर ठिकाणी अद्यावत बस स्टॉप उभारण्याची मागणी वाशी विभागातील शालेय विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांकडून होत होती. सदर मागणीची दखल घेत आमदार मंदाताई म्हात्रे यांनी आमदार निधी विकास अंतर्गत बस स्टॉप उभारल्याने वाशी विभागातील प्रवाशांनी तसेच विद्यार्थी, पालक महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी त्यांचे आभार मानले.
याप्रसंगी माजी नगरसेवक राजू शिंदे, माजी नगरसेविका माधवी शिंदे, विकास सोरटे, विक्रम पराजुली, जयंत पाटील, प्रताप भोसकर, रामकृष्ण अय्यर, प्रमिला खडसे, प्रवीण भगत, जेम्स आवारे, राखी पाटील, सुमा रंजिता, पदम पांडे, अतुल भालंगे, तानाजी शिंदे तसेच ज्येष्ठ नागरिक आणि महिला उपस्थित होत्या.