बाळकुम मधील ओक इमारतीत आग

ठाणे : ठाणे शहरातील बाळकुम मधील ओक बिल्डिंग या ३० माळ्याच्या इमारतीतील सी विंगमध्ये २२ व्या माळ्यावरील हॉलमध्ये दिव्यामुळे आग लागण्याची घटना ३१ जानेवारी रोजी रात्री ८.१५ वाजताच्या सुमारस घडली. या दुर्घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, घरातील एसी, सीलिंग, सोफा आणि वायरिंग जळाली.

ठाणे (पश्चिम) शहरातील बाळकुम येथील तळ अधिक ३० मजली ओक बिल्डिंग मधील सी विंग  मधील २२व्या मजल्यावरील रुम नंबर-२२०३ मध्ये राहणाऱ्या  हिरल लोधाया यांनी हॉलमध्ये लावलेल्या दिव्याने पडद्याला आग लागली. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेऊन अग्निशमन दलाचे जवान, आपत्ती व्यवस्थापन कक्ष कर्मचारी यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत रुम मधील एसी, सीलिंग, सोफा आणि वायरिंग जळून नुकसान झाले आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

डीपीएस फ्लेमिंगो तलाव वाचविण्याची मागणी