उरण तालुका मनसेच्या वतीन महामार्गावरील खड्ड्यांत कमळाची फुले वाहून अनोळख्या पध्दतीने आंदोलन
उरण तालुका मनसेकडून महामार्गावरील खड्ड्यांत कमळाची फुले वाहून केंद्र व राज्य सरकारचा निषेध
उरण : मुंबई - गोवा महामार्गाचे काम गेली १७ वर्षे पूर्णत्वास गेले नाही. त्याचा त्रास हा दर दिवशी प्रवास करणाऱ्या नोकरदार, प्रवासी नागरिक, वाहन चालक, विद्यार्थी तसेच रुग्णांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे गणेशोत्सवापुर्वी सदर रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेऊन,उत्तम दर्जाचा महामार्ग बनविण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने पुढाकार घ्यावा या आपल्या मागणीसाठी शुक्रवारी ( दि१८) उरण तालुका मनसेच्या वतीन महामार्गावरील खड्ड्यांत कमळाची फुले वाहून अनोळख्या पध्दतीने आंदोलन उभारण्यात आले आहे. यावेळी मनसेचे उरण तालुका अध्यक्ष सत्यवान भगत व पदाधिकारी, कार्यकर्ते यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पनवेल येथील मेळाव्यात मुंबई - गोवा महामार्गाच्या दुरावस्थेबद्दल मनसेचे नेते राज ठाकरे यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. तसेच १७ वर्ष रखडलेल्या महामार्गाच्या दुरावस्थेबद्दल केंद्र व राज्य सरकारला जागे करण्यासाठी मनसे कडून वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलन उभारण्याचे आदेश दिले. त्या आदेशाची अंमलबजावणी म्हणून रायगड जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली उरण तालुक्याच्या वतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष सत्यवान भगत यांनी शुक्रवारी ( दि१८) अनोळख्या पध्दतीने आंदोलन सुरू केले. यावेळी आंदोलनात सहभागी झालेल्या मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक कांबळी, मंगेश वाजेकर,तालुका उपाध्यक्ष राकेश भोईर, बबन ठाकूर अनिल गावंड, अभिजीत घरत, श्रीरंग म्हात्रे, जितेंद्र पाटील , समाधान गावंड, अजित ठाकूर यांनी महामार्गावरील खड्ड्यांत कमळाची फुले वाहून केंद्र व राज्य सरकारचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला.