सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी ४० टक्के वाणिज्यिक वापराची मागणी

आ. मंदाताई म्हात्रे यांच्या प्रत्यांनाना यश; प्रस्ताव मंजुरीसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना साकडे

 नवी मुंबई  : आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांमुळे बेलापूर येथील साठे आठ एकर जागेवर होणाऱ्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजच्या प्रकियेला गती मिळाली आहे. ‘सिडको'ने दिलेला भूखंड महापालिकेने विकत घेतला आहे. याबाबत आता पुढे जाऊन रुग्णालय आणि मेडिकल कॉलेजसाठी ४० टक्के वाणिज्यिक वापराच्या परवानगीसाठी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे प्रयत्नशील आहेत. त्याबाबतचा प्रस्ताव ‘सिडको'ने नगरविकास खात्याला पाठविला असून याविषयी आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांच्याकडून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा सुरु आहे.

सीबीडी-बेलापूर, सेक्टर-१५ ए मधील भूखंड क्र.४ बाबत नवी मुंबई महापालिकेच्या वतीने सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजसाठी ‘सिडको'सोबत करारनामा करण्यात येणार आहे. महापालिकेने याबाबत ‘सिडको'ला पत्र देऊन एकूण भूखंडाचे ४० टक्के क्षेत्र वाणिज्यिक वापरासाठी देण्यात यावे, अशी मागणी केली आहे. ‘सिडको'ने याआधी एकूण १५ टक्के वाणिज्यिक वापरासाठी महापालिकेला परवानगी देण्याचे ठरवले होते. मात्र, महापालिकेने ४० टववयांची मागणी केल्याने ‘सिडको'ने त्याअनुषंगाने ३ ऑगस्ट रोजी महापालिका अधिकारी तसेच ‘सिडको'चे नियोजन, वसाहत-सामाजिक सेवा विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. सदर बैठकीत हॉस्पिटल-मेडिकल कॉलेजच्या दिलेल्या भूखंडामध्ये १५ टक्के वाणिज्य वापर अनुज्ञेय भाडेपट्टा आकारुन देय असल्याची बाब तसेच महापालिकेच्या मागणीनुसार १५ टक्के ऐवजी ४० टक्के वाणिज्य वापर अनुज्ञेय होणेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली होती. त्यानुसार ‘सिडको'ने नगरविकास विभागाकडे प्रस्ताव सादर केला आहे.

सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज या प्रयोजनासाठी ‘सिडको'ने साठे आठ एकराचा भूखंड महापालिकेला दिला आहे. सदर भूखंड घेताना शहरात महापालिकेची अनेक रुग्णालये असताना आणखी रुग्णालयाची गरज का? खर्च महापालिकेला परवडेल का? आर्थिक भाराचे काय? असे अनेक प्रश्न मला विचारुन कोंडीत पकडण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला होता.  मात्र, त्यावर मात करत महापालिकेला रुग्णालय चालवणे जड जाऊ नये म्हणून मी ४० टक्के वाणिज्यिक वापराची मागणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे. तसेच महापालिकेने देखील तातडीने मागणी केल्यावर ‘सिडको'ने तातडीने नगरविकास विभागाला सदरचा प्रस्ताव पाठविला आहे, असे आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.

सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजच्या भूखंडावर ४० टवके वाणिज्यिक वापराबद्दलच्या प्रस्तावाला लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मान्यता मिळणार आहे. यानंतर महापालिकेला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज चालविणे महापालिकेला सोपे जाणार आहे.
-आमदार सौ. मंदाताई म्हात्रेे-बेलापूर.

 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

‘एनएमएमटी'च्या जखमी वाहकाला ‘महाराष्ट्र कर्मचारी युनियन'ची मदत